Instagram : आजकाल सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पैसे कमावण्याचा ट्रेंड बऱ्यापैकी फॉलो केला जातोय. यामध्ये जर तुम्हाला फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर यासाठी तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुक पेजला कनेक्ट करणं फार गरजेचं आहे. अनेकदा काही एजन्सी यामध्ये तुम्हाला महत करतात. पण, अनेकदा असं होतं की, खूप प्रयत्न करूनही आपल्याला इन्स्टाग्राम फेसबुकला कनेक्ट करता येत नाही. अशा वेळी या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोपी पद्धत सांगणार आहोत. जेणेकरून काही मिनिटांतच तुमची ही प्रक्रिया पूर्ण होईल.
जर तुमचे पेज मेटा बिझनेस असेल तर तुमचे Instagram वर व्यावसायिक अकाऊंट असणं गरजेचं आहे. जर, तुमचं व्यावसायिक अकाऊंट नसेल तर ते आधी तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढची इन्स्टाग्राम -फेसबुक प्रक्रिया फॉलो करावी लागेल.
फेसबुक पेजला इन्स्टाग्रामशी अशा पद्धतीने कनेक्ट करा
यासाठी, सर्वात आधी तुम्हाला फेसबुकवर (Facebook) लॉग इन करावं लागेल. त्यानंतर हे अकाऊंट तुमच्या इन्स्टाग्रामशी कनेक्ट करा.
प्रोफेशनल डॅशबोर्ड डाव्या आकाराच्या मेन्यूमधूून, लिंक केलेल्या अकाऊंटवर क्लिक करा.
तुमचं अकाऊंट कनेक्ट करण्यासाठी तसा ऑप्शन तुमच्या स्क्रिनवर दिसेल तिथे क्लिक करा. या ठिकाणी इन्स्टाग्राम यूजरचा पासवर्ड एंटर करून लॉग इन करा.
तसेच, जर तुम्हाला तुमच्या पेजवरून इंस्टाग्राम अकाऊंट 'Disconnect' करायचं असेल तर त्यासाठी 'Disconnect Account' वर क्लिक करा.
इन्स्टाग्रामला फेसबुक पेजशी जोडण्याचे फायदे
- तुम्ही जर तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फेसबुक पेजशी कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळतील. जसे की, एखादी पोस्ट केल्यानंतर ती दोन्ही प्लॅटफॉर्मवर टाकण्याची गरज भासणार नाही. कारण, तुम्हाला एकाच वेळी दोन्ही प्लॅटफॉर्मवर शेअर करता येईल.
- याशिवाय, जर तुम्हाला इन्स्टाग्राम जाहिराती शेअर करायच्या असतील किंवा थर्ड पार्टी ॲप कनेक्ट करायचे असतील तर तुम्ही ते सहज करू शकाल.
- मेसेज आणि इंस्टाग्राम डायरेक्ट मेसेज मेसेंजर किंवा मेटा बिझनेस सूटमधील इनबॉक्समधून उपलब्ध असतील.
Instagram वरून कमाई करण्याचे मार्ग
जर आपण Instagram वरून पैसे कमावण्याच्या सोप्या मार्गाबद्दल बोललो तर असा कोणताही सोपा मार्ग नाही. प्रत्येक कामात जशी प्रतिभा आणि सर्जनशीलता महत्त्वाची असते. इन्स्टाग्रामच्या बाबतीतही तसंच आहे. या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला तुमचा कंटेंट व्हायरल होण्यासाठी क्वालिटी आणि प्रमाण यावर लक्ष देणं गरजेचं आहे.
तुमचं पेज ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला रोज काही फोटो, व्हिडीओ आणि स्टोरीज इन्स्टाग्रामवर सतत शेअर करावे लागतील. तुम्ही महिन्यातून 10 दिवस लाईव्ह देखील जाऊ शकता. यामुळे तुमच्या फॉलोअर्सशी थेट कनेक्ट होऊ शकता. तसेच, तुम्ही कॉलेबरेशनचा पर्याय देखील निवडू शकता. जाहिरातींच्या माध्यमातून देखील तुम्हाला चांगले पैसे कमावण्याची संधी मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या :