Smartphone : तुम्ही जर विवो Vivo यूजर्स असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे, Vivo ने आपली v30 सीरिज भारतात लॉन्च केली आहे. या  कंपनीने Vivo V30 आणि Vivo V30 Pro स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन ब्लू, पीकॉक ग्रीन आणि क्लासिक ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच, कंपनीने यात 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे जी 80W फास्ट चार्जरला सपोर्ट करते.


कंपनीने Vivo V30 स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये सादर केला आहे, ज्यामध्ये 8 GB + 128 GB, 8 GB + 256 GB आणि 12 GB + 256 GB रॅम आणि स्टोरेज असेल. जर तुम्हाला Vivo च्या या दोन स्मार्टफोनची माहिती जाणून घेऊयात. 


Vivo V30 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स (Vivo V30 Pro Smartphone Specifications)


विवोचा हा स्मार्टफोन क्लासिक ब्लॅक, पीकॉक ग्रीन आणि अंदमान ब्लू या तीन कलरच्या ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. Vivo V30 Pro मध्ये अल्ट्रा स्लिम 3D वक्र डिस्प्ले आहे. तसेच, यात 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या Vivo फोनमध्ये MediaTek Dimension 8200 चिपसेट देण्यात आला आहे.


Vivo V30 फोन डिस्प्ले


या Vivo फोनमध्ये वक्र 6.78 इंच स्क्रीन आहे. फोनमध्ये AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 2800 nits चा पीक ब्राइटनेस आहे. हा फोन कॅरी करणे खूप सोपे आहे, कारण त्याचे वजन फक्त 186 ग्रॅम आहे.


Vivo V30 फोनचा कॅमेरा आणि इतर तपशील


या Vivo फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP AF+OIS मुख्य आणि 50MP AF वाइड अँगल कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो जो 80W चार्जरला सपोर्ट करतो.


Vivo V30 ची किंमत किती?


Vivo v30 फोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज फोन 33,999 रुपयांना, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा फोन 35,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तर त्याचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज फोन 37,999 रुपयांना ऑफर करण्यात आला आहे. हा फोन आजपासून Vivo च्या अधिकृत साईट आणि Flipkart वर बुक केला जाऊ शकतो. तसेच, त्याची डिलिव्हरी 14 मार्चपासून सुरू होईल. ग्राहकाला 4000 रुपयांची सूट मिळेल.


Vivo V30 Pro ची किंमत किती?


Vivo v30 Pro दोन कॉन्फिगरेशनमध्ये, 8GB RAM आणि 256GB स्टोरेजमध्ये 41,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तसेच, त्याची 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज 46,999 रुपयांना देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची बुकिंग आजपासून सुरू झाली असून त्याची डिलिव्हरी 14 मार्चपासून सुरू होणार आहे. ग्राहकाला 4000 रुपयांची सूट मिळेल.


महत्त्वाच्या बातम्या :


Samsung Smartphone : आकर्षक लूक आणि फास्ट चार्जिंग स्पीडसह Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन लॉन्च; किंमत माहितीये?