Vivo V29e Launch Date : जर तुम्हीसुद्धा Vivo स्मार्टफोनचे चाहते आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo लवकरच भारतात कॅमेरा-केंद्रित स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने कर्व्ड डिस्प्लेसह स्मार्टफोनचे स्लिम डिझाईन शेअर केले होते. दरम्यान, Vivo ने स्मार्टफोनचे कॅमेरा डिटेल्स शेअर केले आहेत. या डिटेल्सविषयी आणि स्मार्टफोनच्या इतर फिचर्सविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
Vivo V29e ड्युअल कॅमेरा सेटअपसह लॉन्च केला जाईल. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP असेल. ग्राहकांना सेल्फी आणि रील शूट करण्यासाठी 50MP कॅमेरा मिळेल. जे लोक सतत आपल्या फॉलोअर्ससाठी सोशल मीडियावर कंटेंट पोस्ट करतात, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे. कारण या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी ही Reels आणि Vlogs दोन्हीसाठी बेस्ट असणार आहे असा कंपनीचा दावा आहे.
स्मार्टफोनचा रंगही बदलणार
विवोने सांगितले की, फ्रंट कॅमेऱ्यात EYE AUTO-FOCUS फिचर आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 2 कलर व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकणार आहेत. V29e आर्टिस्टिक रेड व्हेरियंटला कलर बदलणारे काचेचे पॅनेल मिळते जे ब्लॅक कलरमध्ये बदलते. मात्र, जेव्हा बॅक पॅनेल अतिनील प्रकाशाच्या संपर्कात येईल तेव्हाच स्मार्टफोनचा कलर बदलू शकेल असं कंपनीचं म्हणणं आहे.
किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo V29e आकर्षक डिझाईन आणि कर्व्ड डिस्प्लेसह मोटोरोला एज 40 सारखा दिसतो. हा स्मार्टफोन मोटोरोलाच्या स्मार्टफोनपेक्षा थोडा रूंदीला आहे. या स्मार्टफोनची रूंदी 7.57 mm आहे तर Motorola Edge 40 ची रूंदी 7.49 mm आहे. स्मार्टफोनच्या लिंकनुसार पाहिल्या, स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.73-इंच डिस्प्ले, 4,600mAh बॅटरी आणि 8GB RAM सह Qualcomm Snapdragon 480 Plus SoC चा सपोर्ट मिळू शकतो. त्याची किंमत जुन्या Vivo V-सीरीज स्मार्टफोनप्रमाणे 30,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. फोनचा बेस व्हेरिएंट 25,000 रुपयांपासून सुरू होऊ शकतो. ही सर्व माहिती लीकवर आधारित आहे. अचूक माहितीसाठी, अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'हे' स्मार्टफोनही लवकरच लॉन्च केले जातील
Vivo व्यतिरिक्त इतर कंपन्या देखील त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. यामध्ये Honor, IQ, Jio, Real Me इत्यादींचा समावेश आहे. iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन 31 ऑगस्ट रोजी लाँच होईल. यात 64MP OIS कॅमेरा, MediaTek Dimensity 7200 SOC, 8GB RAM आणि 66W फास्ट चार्जिंगसह 4,600mAh बॅटरी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :