Twitter Verified: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा (Twitter) पदभार सांभाळल्यापासूनच ट्विटरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहे. ट्विटरसंदर्भातील बदलांमुळे एलॉन मस्क नेहमीच चर्चेत अतात. काही दिवसांपूर्वी ट्विटरचा आयकॉनिक लोगो ब्लू बर्ड काढून त्याऐवजी Doge Image ट्विटर होमपेजवर दिसत होती. आता ट्विटरनं आपला आयकॉनिक लोगो पुन्हा ठेवला आहे. पण त्यासोबतच आणखी एक बदल केला आहे. 'ट्विटर व्हेरीफाईड'कडून (Twitter Verified) सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आले आहेत. म्हणजेच, आता ट्विटर व्हेरिफाईड कोणालाही फॉलो करणार नाही.


ट्विटरनं यापूर्वी सुमारे 420,000 व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो केलं होतं. तसेच, ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, कंपनीने 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या युजर्ससाठी चेकमार्क (ब्लू टिक) काढून टाकण्याचा इशारा दिला होता. एलॉन मस्क यांनी स्पष्ट केलं होतं की, ज्यांच्याकडे ट्विटर ब्लू मेंबरशिप नाही, त्यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. अशातच आता ट्विटर व्हेरिफाईडकडून सगळ्यांनाच अनफॉलो करण्यात आलं आहे. 






सब्सक्रिप्शनवर अनेक अतिरिक्त फायदे 


आतापर्यंत फक्त सेलिब्रिटी, सरकारी संस्था किंवा प्रसिद्धीझोतात असलेल्या व्यक्तींना ट्विटरकडून व्हेरिफाईड टॅग असलेलं ब्लू टिक दिलं जायचं. दरम्यान, आता एलॉन मस्कच्या सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत, कोणीही दरमहा पैसे देऊन ब्लू टिक विक घेऊ शकणार आहे. यासोबतच ब्लू टिक युजर्सना काही अतिरिक्त सुविधा देखील मिळतील, जसे की ट्वीटची कॅरेक्टर लिमिट अधिक असेल. यासोबतच ट्वीटमध्ये एडिट किंवा अनडू पर्यायही उपलब्ध असतील.