Elon Musk Shuts Office Down : भारतातील ट्विटर ऑफिसला टाळं (Twitter Offices in India) लागलं आहे. ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरने भारतातील त्यांची दोन कार्यालये बंद केली आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता कंपनीने मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) तील कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आलं आहे. याआधीही ट्विटरवरून मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरून हटवण्यात आलं होतं.
Twitter Shuts Office Down : ट्विटरची भारतातील दोन कार्यालये बंद
ट्विटरने भारतात सुरु असलेली दोन कार्यालये बंद केली आहेत. भारतात ट्विटरी तीन कार्यालयं होती, त्यातील दोन कार्यालयांना आता कुलूप लागलं आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. आता कंपनीने भारतातील तीनपैकी दोन कार्यालये बंद केली आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास (Work From Home) सांगितलं आहे. खर्च कमी करण्यासाठी (Cost Cutting) ट्विटरनं हे पाऊल उचललं आहे.
Twitter Offices in India : बंगळुरूमधील कार्यालय पूर्वीप्रमाणेच सुरू
दरम्यान, गेल्या वर्षी ट्विटरने आपल्या भारतातील ट्विटर कार्यालयातील कर्मचाऱ्यांपैकी 90 टक्के कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये नोकरीवरून (Twitter Layoff) काढून टाकलं. यामुळे 200 हून अधिक लोकांना याचा फटका बसला. या निर्णयानंतर कंपनीने मुंबई आणि नवी दिल्ली ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ट्विटर कंपनीचे बंगळुरूमधील कार्यालय पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
Twitter Office Shut Down : कर्मचाऱ्यांना काढून टाकणे आवश्यक
ट्विटरचे मालक झाल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच मस्क यांनी 7,500 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यावर टिकाही झाली. मस्क यांनी कर्मचारी कपात करण्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, ट्विटरच्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणं आवश्यक आहे, कारण कंपनीला दरवर्षी ती अब्ज डॉलरचे नुकसान झाले असते. मस्क यांनी सांगितलं की, त्यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलेल्या ट्विटर कंपनीचा खर्च कमी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :