WhatsApp New Features : WhatsApp चे भारतात 550 मिलियन पेक्षा ही अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. विविध फिचरमध्ये कंपनी वेळोवेळी त्यात अपडेट आणत असते आणि या वर्षी व्हॉट्सअॅपने अनेक नवीन आणि भन्नाट फीचर्स युजर्सना दिले आहेत. जसे की चॅट लॉक, स्क्रीन शेअर, एचडी फोटो शेअर इ. आम्ही तुम्हाला WhatsApp च्या अशा 7 फीचर्स बदल सांगणार आहोत जे कंपनीने यावर्षी लॉन्च केले आहेत. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होई शकतो.
Chat Lock
WhatsApp ने अलीकडेच मेसेज ची सेक्युरिटी सुधारण्यासाठी हे फिचर आणले. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट्स लपवू शकता. चॅट लॉक केल्यावर, ते दुसर्या फोल्डरमध्ये लपवले जाईल आणि फक्त तुमच्याच फिंगरप्रिंटच्या मदतीने लॉक उघडू शकेल. कोणतीही चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला चॅटच्या प्रोफाइलवर जाऊन ते ऑप्शन ऑन करावे लागेल.
HD Photo Quality
WhatsApp ने अलीकडेच वापरकर्त्यांना अशी सुविधा दिली आहे की, ते समोरच्या व्यक्तीला HD Photo पाठवू शकतात. म्हणजेच, फोटोची क्वॉलिटी आहे तशीच ठेऊन तुम्ही original फोटो शेअर करू शकता.
Silence Unknown Calls
WhatsApp वर येणाऱ्या unknown कॉल्स ला तुम्ही silent करू शकता . यामुळे तुम्हाला मीटिंगमध्ये किंवा घरात अशा काॅल्सचा त्रास होणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.
Hide Online Presence
तुम्ही WhatsApp वर active दिसायचे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच सेटिंग बदलून तुम्ही ऑनलाइन असूनही तुम्ही तुमचा मित्रांना ऑफलाइन दाखवू शकता. हा ऑप्शन तुम्हाला सेटिंगमध्ये दिसेल.
WhatsApp Linked Device
तुम्ही तुमचे WhatsApp Account चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरू शकता. एकदा तुम्ही लॉगिन केल्यानंतर, तुम्ही प्रायमरी काऊंट चा डेटा बंद जरी केला तरीही तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही वेगवेगळ्या डिवाइस वर आरामात WhatsApp चालवू शकता.
Edit Message
आता तुम्ही WhatsApp वर पाठवलेले मेसेज एडिट करू शकता. संदेश पाठविल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत तो एडिट करता येऊ शकतो. या वेळेनंतर कोणताही मेसेज एडिट होणार नाही. कोणताही मेसेज एडिट करण्यासाठी , त्या मेसेज ला प्रेस करून ठेवा . हे केल्यावर तुम्हाला मेसेज एडिट करण्याचा ऑप्शन दिसेल.
Screen Share
WhatsApp ने नुकतीच हे नवीन feature अॅड केले आहे. आता तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान तुमची स्क्रीन शेअर करून गोष्टी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता.