WhatsAppवरील चुकीचा मेसेज असा करा UnSend... पाहा ही नवी ट्रिक!
ब्लॉक केल्यानंतर काही दिवस तुम्ही त्या व्यक्तीला अनब्लॉक करु नका कारण की, व्हॉट्स अॅप 30 दिवसांपर्यंतचे तुमचे मेसेज रिस्टोअर करु शकतं.
याशिवाय तुम्ही चुकीचा मेसेज पाठवल्यास तुमच्या मोबाइलमधील कॉन्टॅक्ट ब्लॉक करा. जेणेकरुन चुकीचा मेसेज त्या व्यक्तीला मिळणार नाही.
डेटा कनेक्शन बंद केल्यावर तुम्ही चुकीचा मेसेज सर्वात आधी डिलीट करा.
जोपर्यंत मेसेज सेंडसाठीची सिंगल टीक येत नाही तोवर तुम्ही तुमचा डेटा कनेक्शन ऑफर करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा चुकीचा मेसेज रिसिव्ह होणार नाही.
जर आपण एखादा मेसेज एखाद्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये चुकून पाठवला तर एक गोष्ट अगदी पटकन करा. ते म्हणजे तुमच्या मोबाइलमधील वायफाय किंवा इंटरनेट कनेक्शन तात्काळ बंद करा. ही गोष्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, तु्म्हाला हे काम फारच वेगानं करावं लागणार आहे.
पण आता काळजी करु नका, आता आम्ही एक अशी ट्रिक तुम्हाला देत आहोत की, ज्याच्या मदतीनं तुम्ही सेंड केलेला व्हॉट्सअॅप मेसेज अनसेंड करु शकतात.
मेसेज सेंड केल्यानंतर आपल्याला जाणीव होते की, आपण चुकीचा मेसेज सेंड केला आहे. पण त्यानंतर आपण निव्वळ हतबल असतो. कारण की, त्यानंतर आपण काहीही करु शकत नाही.
व्हॉट्सअॅप यूजर्सना बऱ्याचदा एका अडचणीचा सामना करावा लागतो. अनेकदा काही जण एकाच वेळी अनेकांशी चॅटिंग करत असतात. अशावेळी एखादा चुकीचा मेसेज दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण पाठवतो.