New Tecno Spark 20C : टेक्नो कंपनीने बाजारात नवीन Tecno Spark 20C फोन लाँच केला आहे. Tecno ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फोन Tecno Spark 20C लाँच केला आहे. Tecno Spark 20C एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. टेक्नो कंपनीच्या ग्लोबल वेबसाईटवर या फोनसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला आयफोनमध्ये मिळणाऱ्या फीचरसारखेच फिचर्स मिळतील. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर Tecno Spark 20C फोनमध्ये डायनॅमिक पोर्ट सपोर्ट असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


iPhone सारखा रॉयल लूक देणारा स्मार्टफोन


आता टेक्नो कंपनी नवीन स्मार्टफोनसह बाजारत उतरली आहे. Tecno Spark 20C फोन भन्नाट फिचर्ससह लाँच करण्यात आला आहे. अलिकडे कंपनीने Tecno Spark Go 2024 फोन मलेशियामध्ये लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोनचा लूक आयफोनप्रमाणे आहे.


आयफोनप्रमाणे डायनॅमिक पोर्ट सपोर्ट


टेक्नोचा Tecno Spark 20C हा फोन आयफोनप्रमाणच डायनॅमिक पोर्ट फिचरसह उपलब्ध करण्यात आला आहे. डायनॅमिक पोर्ट सपोर्ट फिचर कॉलिंगची उत्तम सेवा देण्यासाठी ओळखलं जातं. या फिचरमुळे इनकमिंग कॉल, चालू कॉल किंवा मिस्ड कॉल याबाबत माहिती मिळते. तसेच बॅटरी चार्जिंगची माहिती टॉप स्क्रिन उपलब्ध होईल. कंपनीने हा फोन सध्या फक्त एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी लाँच केला आहे. हा फोन जागतिक वेबसाईटवर उपलब्ध आहे.


50MP कॅमेरा आणि 16GB रॅमसह दमदार फोन लाँच


Tecno Spark 20C फोनमध्ये ऑक्टा कोर-प्रोसेसर (Octa-core) CPU सह सादर केला आहे. Tecno Spark 20C स्मार्टफोन 6.6 इंच HD + 90Hz LCD डिस्प्लेसह येतो. स्मार्टफोन कंपनीने 4GB + 4GB रॅम आणि 8GB + 8GB रॅम सह सादर केला आहे. फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP+AI-CAM आणि ड्युअल फ्लॅशसह आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे.


Tecno Spark 20C फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग फीचर देण्यात आलं आहे. या स्मार्टफोन ग्रॅव्हिटी ब्लॅक, मिस्ट्री व्हाईट, अल्पेन्ग्लो गोल्ड, मॅजिक स्किन या रंगात उपलब्ध (Colour Option) आहे.


Tecno Spark 20C ची किंमत


टेक्नोचा हा फोन दोन व्हेरियंटमध्ये आणला जात आहे. पण, कंपनीने दोन्ही व्हेरियंटच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. यासह, Tecno चा नवीन फोन Tecno Spark 20C च्या विक्रीसाठी केव्हा उपलब्ध होईल याबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.