Smartphone : बजेट फ्रेंडली स्मार्टफोन (Smartphone) प्रमाणेच काहीजण हे प्रीमियम स्मार्टफोनचे चाहते असतात. अशातच तुम्हाला जर नवीन प्रीमियम स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल पण नेमका कोणता स्मार्टफोन घ्यावा याबाबत जर तुमचा गोंधळ होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. हे स्मार्टफोन थोडे महाग असतील पण स्मार्टफोनचे फिचर्स मात्र अप्रतिम असतील. या यादीत टॉप ब्रँडच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. Samsung, Iku आणि OnePlus हे स्मार्टफोन देखील यामध्ये आहेत. या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या डिस्काऊंटबद्दल अधिक जाणून घेऊयात. 


OnePlus 12 ची किंमत आणि वैशिष्ट्ये काय असतील?


16GB रॅम, 512GB स्टोरेजसह स्मार्टफोन, तुम्हाला OIS सह 50 मेगापिक्सेल कॅमेरा, 64 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. OnePlus 12 मध्ये 5400mAh बॅटरी आहे. तुम्हाला हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर फक्त Rs 69,999 मध्ये उपलब्ध आहे. 


iQOO 12 5G : किंमत आणि वैशिष्ट्ये


16GB रॅम, 512GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची मूळ किंमत 64,999 रुपये आहे परंतु तुम्हाला तो 11 टक्के डिस्काउंटसह केवळ 57,999 रुपयांमध्ये मिळत आहे. iQOO 12 मध्ये, तुम्हाला LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 64-मेगापिक्सेल 3x टेलिफोटो कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी, फ्रंटचा कॅमेरा हा 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.


Samsung Galaxy S23 FE 5G


दिग्गज कार निर्माता कंपनी सॅमसंगचा (Samsung) चा हा स्मार्टफोन Galaxy S23 FE Exynos 2200 चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच ग्राहकांना डिव्हाईसमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तुम्हाला जर हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. जरी या स्मार्टफोनची मूळ किंमत 79,999 रुपये आहे. 34 टक्के डिस्काऊंटसह तुम्ही हा स्मार्टफोन केवळ  52,995 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 


या शिवाय या बजेटमध्ये तुम्हाला इतर पर्यायही उपलब्ध करण्यात आले आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Honor X9b 5G Smartphone : 16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन दमदार फीचर्ससह लॉन्च