Jio International Roaming Plan : रिलायन्स जिओने UAE, USआणि Annual पॅक असे तीन (Jio) नवे प्लॅन लाँच केले आहेत. या नव्या प्लॅन लिस्टमध्ये युएईचा प्लॅन 898 रुपयांपासून सुरू होतो, तर यूएसए प्लॅन 1,555 रुपयांपासून सुरू होतो. याशिवाय इन-फ्लाइट पॅकची किंमत फक्त 195 रुपयांपासून सुरू होते. या सर्व जिओ प्लॅन्स नेमके कसे असणार आहेत पाहूयात..


UAE साठी Jio Plans



  • पहिला प्लॅन : 898 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी 7 दिवसांची असून यामध्ये 100 एसएमएस, 100 मिनिटे इनकमिंग आणि आऊटगोइंग तसेच 1 GB डेटा मिळतो.

  • दुसरा प्लॅन : 1,598 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी 14 दिवसांची आहे, ज्यामध्ये 100 एसएमएस, 150 मिनिटे इनकमिंग आणि आउटगोइंग तसेच 3 GB डेटा मिळतो.

  • तिसरा प्लॅन : 2,998 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी  21 दिवसांची आहे, ज्यात 100 एसएमएस, 250 मिनिटे इनकमिंग आणि आउटगोइंग तसेच 7 GB डेटा मिळतो.


अमेरिका, मेक्सिको आणि अमेरिकन देशांसाठीचा प्लॅन



  • पहिला प्लॅन : 1,555 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी 10 दिवसांची आहे, ज्यामध्ये 100 एसएमएस, 150 मिनिटे इनकमिंग आणि आउटगोइंग तसेच 7 GB डेटा मिळतो.

  • दुसरा प्लॅन : 2,555 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी  21 दिवसांची आहे, ज्यामध्ये 100 एसएमएस, 250 मिनिटे इनकमिंग आणि आउटगोइंग तसेच 15 GB डेटा मिळतो.

  • तिसरा प्लॅन : 3,455 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे, ज्यामध्ये 100 एसएमएस, 250 मिनिटे इनकमिंग आणि आउटगोइंग तसेच 25 GB डेटा मिळतो.


Yearly Plans



जिओने इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनसाठी एक वार्षिक प्लॅनही लाँच केला आहे, ज्याची व्हॅलिडीटी 365 दिवस म्हणजेच पूर्ण एक वर्ष आहे. या प्लॅनची किंमत 2,799 रुपये आहे. यात युजर्संना 100 मिनिटे कॉल, 100 एसएमएस आणि 2 GB डेटा मिळतो. या प्लॅनअंतर्गत युजर्संना 51 देशांमध्ये प्रवास करून जिओचे रोमिंग बेनिफिट्स घेण्याचा फायदा मिळतो. 


फ्री इन-फ्लाइट प्लॅन


जर तुम्हाला अनेक देशांमध्ये प्रवास करायचा असेल आणि त्यासाठी तुम्हाला बजेटमध्ये एक चांगला प्लॅन हवा असेल तर जिओने ही व्यवस्था तुमच्यासाठी केली आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला या प्लॅन्सबद्दल सांगतो. 



  • पहिला प्लॅन : 2,499 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी 10 दिवसांची आहे, ज्यात दररोज 100 एसएमएस, दररोज 100 मिनिटे आउटगोईंग, फ्री इनकमिंग आणि दररोज 250 एमबी डेटा मिळतो. यात एकूण 35 देशांचा समावेश आहे.

  • दुसरा प्लॅन : 4,999 रुपये – या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची असून यात 1500 एसएमएस, 1500 मिनिटे आऊटगोइंग, फ्री इनकमिंग आणि 5 GB डेटा मिळतो. यात एकूण 35 देशांचा समावेश आहे.

  • तिसरा प्लॅन : 3,999 रुपये – या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची असून यात 100 एसएमएस, 250 मिनिटे आऊटगोइंग, फ्री इनकमिंग आणि 4 GB डेटा मिळतो. यात एकूण 51 देशांचा समावेश आहे.

  • चौथा प्लॅन : 5,000 रुपये - या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची असून यात 500 एसएमएस, 400 मिनिटे आऊटगोइंग, फ्री इनकमिंग आणि 6 GB डेटा मिळतो. यात एकूण 51 देशांचा समावेश आहे.


इतर महत्वाची बातमी-


CES 2024 : लॉंच झाला आहे Android आणि Windows दोन्हींवर चालणारा लॅपटॉप, जाणून घ्या नेमकं कसं करतो काम?