Samsung Galaxy S23 Ultra : Samsung Galaxy S23 Ultra फोन घेण्याचा विचार (Samsung) करत  तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आता एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 74,999 रुपयांमध्ये कमीत कमी किमतीत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ही बातमी चुकीची असल्याचं समोर येत आहे. असं असलं तरीसुद्धा सध्या त्याच्यावर ऑफर सुरू आहेत. जे युजर्स अँड्रॉइड फोन विकत घेण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी कंपनी हा S23 Ultra फोन जास्त आकर्षित करण्याच्या मार्गावर आहे. 



Galaxy S23 Ultra याच्या किमतीवरील रिअल डील 


सध्या फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन्हींवर 12 GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह Galaxy S23 Ultra 1,24,999 रुपयांमध्ये विकले जात आहेत. फ्लिपकार्टवर एचडीएफसी बँकची अशी ऑफर आहे ज्यात तुम्हाला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून प्रीपेड पेमेंट करून 25000 रूपयांपर्यंत सवलत मिळू शकते. त्यामुळे ही किंमत 99,999 रुपयांच्या ही खाली येते. असे असले तरी ही ऑफर काही ठराविक भागांपूर्तीच मर्यादित आहे. 



चालू वर्षी म्हणजे 2024 मध्ये तुम्ही Galaxy S23 Ultra अल्ट्रा खरेदी करावा का?
 
तुम्ही 2024 मध्ये गॅलेक्सी एक्स 23 अल्ट्रा फोन खरेदी करावा की नाही हे खरं तर तुमच्या गरजा आणि बजेट याच्यावर अवलंबून असणार आहे.मात्र तरीसुद्धा येथे हा फोन खरेदी करताना काही विचार करण्यासारखे चांगले वाईट गोष्टी आहेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आता त्याच आपण जाणून घेऊया -


खरेदी केल्यास कोणते फायदे?


High-end space : S23 Ultra हा आता देखील संपूर्ण मार्केटमध्ये सगळ्यात कॅपॅबल असलेला अँड्रॉइड स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो.कारण यामध्ये पावरफुल प्रोसेसर, चांगली कॅमेरा सिस्टीम, प्रीमियम बिल्ड क्वालिटी,तसेच S pen Stylus, IP68 resistance , 120Hz रिफ्रेश रेटसहीत चांगला 2k डिस्प्ले यासारखे अनेक फिचर्स आहेत. 


‌Android 14 update : S23 ultra हा सगळ्यात पहिला non-pixel हा सगळ्यात पहिला असा फोन आहे जो अँड्रॉइड 14 अपडेट रिसिव्ह करू शकतो. यात तुम्हाला नवीन सॉफ्टवेअर फिचर्स सुद्धा मिळणार आहेत. 

discounted price :फ्लिपकार्ट वरील एचडीएफसी बँकमुळे मिळणारी ऑफर यामुळे 99,999 रुपयांपर्यंत सूट  मिळते आहे. जरी तो 1,24,999 रुपयाचा असला तरी यांच्या या ऑफरमुळे तो सध्या मार्केटमध्ये इतर फोनसोबत स्पर्धा करत आहे. 



खरेदी केल्यास कोणता तोटा?



‌Age  : s23 Ultra याला आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे.आणि त्याच्यानंतर आलेला galaxy s24 अल्ट्रा हा सध्या चर्चेत आहे.चांगल्या प्रीमियम टायटॅनियम फ्रेम आणि नवीन गॅलेक्सी AI स्पेसिफिकेशन सोबत s24 अल्ट्रा आणखी चांगल्या फिचर्ससह येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


थोडक्यात गॅलेक्सी S23 अल्ट्रा खरेदी करायचा की नाही हा तुमचाच निर्णय असेल.तुम्ही जर हाय-एंड अँड्रॉइड फोन शोधत असाल तर एचडीएफसी बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या फोनमध्ये S23 अल्ट्रा हा तुमच्यासाठी सगळ्यात चांगला ऑप्शन ठरू शकतो.तरीसुद्धा तुम्ही अजून थोडी वाट पाहिली तर तुमच्यासाठी येणारा Galaxy S24 ultra हा खुप उत्तम पर्याय ठरू शकतो. 
 


किंमतीत चढउतार होण्याची शक्यता


यासोबतच Galaxy S23 ultra ची किंमत येत्या काही महिन्यात वाढू शकते किंवा कमी देखील होऊ शकते. S24 Ultra लॉंच होईल या आशेने काही किरकोळ विक्रेते यांच्याकडे असलेला  जुना स्टॉक लवकर संपवण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे कोणताही फोन खरेदी करण्यापूर्वी बाजारामध्ये या फोनच्या किमतींवर होणारे चढ आणि उतार यावर लक्ष ठेवणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते.


इतर महत्वाची बातमी-


CES 2024 : लॉंच झाला आहे Android आणि Windows दोन्हींवर चालणारा लॅपटॉप, जाणून घ्या नेमकं कसं करतो काम?