Infinix HOT 40i Smartphone : जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Infinix च्या नवीन लाँच झालेल्या स्मार्टफोन Infinix HOT 40i ची आज पहिली विक्री थेट होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त फीचर्स असणारा स्मार्टफोन (Smartphone) जर शोधत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये काय असतील? आणि विक्री किती वाजता सुरु होणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.   


किती वाजता विक्री सुरु होणार?


Infinix HOT 40i ची पहिली विक्री आज दुपारी 12 वाजता थेट होणार आहे. हा फोन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही Starfall Green, Horizon Gold, Palm Blue आणि Starlit Black यापैकी तुमच्या आवडीचा कलर निवडू शकता.  


पहिली विक्री - 21 फेब्रुवारी 2024


ऑनलाईन प्लॅटफॉर्म - फ्लिपकार्ट, दुपारी 12 वाजता


विशेष लॉन्च किंमत – 8999 रू. (अतिरिक्त 1000 रू. एक्सचेंज ऑफ)


Infinix HOT 40i किंमत किती?


किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 9999 किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. मात्र, हा स्मार्टफोन 8999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही हे अतिरिक्त एक्सचेंज ऑफ म्हणून मिळवू शकता. म्हणजेच, तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.


Infinix HOT 40i स्मार्टफोनची वैशिष्ट्ये काय?


प्रोसेसर - Infinix Hot 40i मध्ये Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे.


डिस्प्ले - डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, Infinix चा हा स्मार्टफोन 6.6 इंच LCD HD + 90Hz डिस्प्ले आणि 480 nits ब्राइटनेस सह आणला गेला आहे.


रॅम आणि स्टोरेज - Infinix चा हा स्मार्टफोन 8GB रॅम सह येतो. स्मार्टफोन 1256GB स्टोरेज पर्यायात आणला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅम देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. 


कॅमेरा - कॅमेऱ्याच्या बाबतीत हा स्मार्टफोन फार खास आहे. कारण कमी किंमतीत Infinix Hot 40i मध्ये 50MP+2MP बॅक आणि 32MP फ्रंट कॅमेरा फीचर उपलब्ध आहे. 


बॅटरी – Infinix Hot 40i स्मार्टफोन 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


OnePlus 12R Smartphone : OnePlus 12R खरेदी केलेल्या ग्राहकांना कंपनी पूर्ण रिफंड करणार; नेमकी भानगड काय?