e-SIM Card : जर तुम्ही ई-सिम वापरत असाल(SIM) तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे, कारण असे दोन अॅप्स गुगलने ब्लॉक केले आहेत, जे भारतीयांना ई-सिम विकत असत. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप्स डाऊनलोड करता येणार नाहीत. हे दोन्ही अॅप्स आवश्यक परवानगी न घेता भारतात आंतरराष्ट्रीय ई-सिमची विक्री करत होते. गुगलने अॅपल Airalo आणि Holafly या दोन्हीवर बंदी घातली आहे.
अॅप्सच्या वापरावर निर्बंध
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, दूरसंचार विभाग अर्थात DoT च्या सूचनेनुसार, गुगलने काही अॅप्स ब्लॉक केले आहेत. या अॅप्सचा वापर रोखण्यासाठी इंटरनेट पुरवणाऱ्या अॅप्सना माहिती देण्यात आली आहे. Airalo आणि Holafly हे सिंगापूरस्थित अॅप्स आहेत, जे भारतात ई-सिमची विक्री करत असत.
ई-सिम म्हणजे काय?
ई-सिम हे एक डिजिटल सिम आहे, जे वापरकर्त्यांना फिजिकल सिम कार्ड न वापरता त्यांच्या नेटवर्कसह मोबाईल प्लॅन सक्रिय करण्यास अनुमती देते. भारतात परदेशी सिमकार्ड विकण्यासाठी एखाद्या कंपनीला दूरसंचार विभागाचे एनओसी आवश्यक असते, परंतु ऐरालो आणि होलाफ्ली अॅप्सकडे एनओसी किंवा अधिकृतता नव्हती. अशा तऱ्हेने दूरसंचार विभागाने अॅपल आणि गुगलला हे दोन अॅप्स हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अॅप अॅक्सेसवर निर्बंध
गुगल प्ले स्टोअरने 5 जानेवारीपासून दोन्ही अॅप्सचा अॅक्सेस बंद केला आहे. अॅपल आणि गुगलच्या भारतीय युजर्ससाठी हे अॅप्स बंद करण्यात आले आहेत. मात्र, ते भारताबाहेर वापरासाठी उपलब्ध असेल. दूरसंचार विभागाच्या 2022 च्या धोरणानुसार, भारतीय वापरकर्त्यांना देण्यात आलेले हे सिमकार्ड केवळ देशाबाहेरच वापरले जाऊ शकतात. हे सिम विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी ग्राहकांना पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे द्यावी लागतात. तसेच सिम विक्रेत्यांना दर महा सुरक्षा यंत्रणांना ग्लोबल सिम डिस्ट्रीब्यूशन द्यावे लागणार आहे.
ई-सिमचे फायदे कोणते?
ई-सिम युजर्सला टेलिकॉम ऑपरेटर बदलताना सिमकार्ड बदलण्याची गरज नाही. त्यामुळे मोबाइल नेटवर्क स्विच सोपे होते. ई-सिमवर एका वेळी जास्तीत जास्त पाच व्हर्च्युअल सिमकार्ड साठवता येतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या नेटवर्कवर तुम्हाला पूर्ण सिग्नल मिळत नसेल तर तुम्ही लगेच नेटवर्क बदलू शकता. प्रवास करताना नेटवर्क बदलणे सोपे आहे. भारतात सध्या ई-सिमला सपोर्ट करणारे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यामध्ये अॅपल, सॅमसंग, गुगल, मोटोरोलाच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.
इतर महत्वाची बातमी-
Heater In budget : हिवाळ्यात Havells Heater वर जोरदार डिस्काउंट; स्वस्तात घरी घेऊन या Heater