Foldable Iphone : आयफोन 14 आणि आयफोन 15 लाँच केल्यानंतर, अनेक यूजर्सचे असे म्हणणे आहे की, Apple ने आपल्या नवीन आयफोनमध्ये काही विशेष दिले नाही. याच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या दोन Apple फोनच्या लॉन्चच्या वेळी, Samsung आणि Oppo सारख्या कंपन्यांनी आपले स्वत:चे फोल्डेबल फोन लॉन्च केले.


या सर्व चर्चेदरम्यान आता अशी माहिती समोर येतेय की, Apple चं सध्या आपल्या फोल्डेबल फोनवर काम सुरु आहे. आणि कंपनी फोल्डेबल आयफोनचा प्रोटोटाइप तयार करणार आहे. टेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की Apple चा हा आगामी फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 5 शी स्पर्धा करणार आहे.


ॲपलचा फोल्डेबल फोन कसा असेल?


The Information ने आपल्या एका अहवालात अंतर्गत स्त्रोतांचा हवाला दिला आहे की, Apple किमान दोन क्लॅमशेल-शैलीच्या फोल्डेबल आयफोन मॉडेलचे प्रोटोटाइप बनवत आहे. असाच डिस्प्ले सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फ्लिप डिव्हाइसमध्ये देखील उपलब्ध आहे जो होरिझोंटली फोल्ड होतो. त्यानुसार असे दिसून येते की, फोल्डेबल डिव्हाईसेस अद्याप  विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि अहवालानुसार, ते कंपनीच्या 2024 किंवा 2025 च्या मोठ्या प्रमाणात उत्पादन योजनांमध्ये यांचा सहभाग नसणार आहे. 


फोल्डेबल फोन्सचा विकास कुठपर्यंत पोहोचला आहे?


ऍपलला फोल्डेबल फोन त्याच्या सध्याच्या आयफोन इतकाच जाड ठेवायचा आहे, यासाठी कंपनी फोल्डेबल फोनची जाडी कमी करण्याचा विचार करत आहे.जेणेकरून फोल्ड केल्यावर त्याचा आकार सध्याच्या आयफोनसारखाच असेल. यासाठी फोनच्या बॅटरीचा आकार आणि फोल्डेबल फोनच्या डिस्प्लेवर काम सुरू आहे. अहवालानुसार, Apple ने दोन फोल्डेबल iPhone मॉडेल्सशी संबंधित घटकांसाठी आशियातील किमान एका पुरवठादाराशी संपर्क साधला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फोल्डेबल आयफोन मॉडेल देखील पाइपलाईनमध्ये आहे. सध्याच्या जनरेशनमधील आयपॅड मिनी सारख्याच आकाराची असेल अशी अपेक्षा आहे. सध्याचे मॉडेल 8-इंचाच्या डिस्प्लेसह येते. फोल्डेबल आयफोन किंवा आयपॅडबाबत ॲपलकडून सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या मार्केटमध्ये सॅमसंगचे वर्चस्व आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


iPhone 16 Series : काय सांगता आता 40 मीटर खोल पाण्यातही फोटो आणि व्हिडीओ काढता येणार? अॅपलकडून यूजर्सना मोठं गिफ्ट