Excitel Plans : सध्या सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अर्थात, प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरु आहे. त्यातच आजचा दिवस हा प्रेमी युगुलांसाठी खास आहे. याच निमित्ताने एक्साइट ब्रॉडबँडने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. ही खास व्हॅलेंटाईन डे ऑफर आहे. या ऑफरच्या माध्यमातून, Excitel 200Mbps आणि Excitel 300Mpbps इंटरनेट प्लॅनची ​​किंमत 424 रुपये प्रति महिना पासून सुरू होईल. इतकेच नाही तर या प्लॅन्ससह यूजर्सना 20 OTT ॲप्सचा लाभ मोफत दिला जाईल.


कंपनीचे म्हणणे आहे की, यूजर्स या ऑफरचा लाभ केवळ एक्सिटेल किकस्टार्टर प्लॅन्समध्ये 200Mbps आणि 300Mbps पर्यंतचा स्पीड देऊ शकतील. ही ऑफर किती काळापर्यंत असेल आणि या सेवेच्या कोणत्या प्लॅन्ससाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


Excitel 200 Mbps योजनेची किंमत


तुम्हाला हा प्लॅन 424 रुपये प्रति महिना दराने मिळेल, पण यासाठी तुम्हाला कंपनीकडून एकाच वेळी 12 महिन्यांचा सबस्क्रिप्शन प्लान घ्यावा लागेल. आता 300Mbps पर्यंत स्पीड ऑफर करण्याच्या प्लॅनच्या किंमतीबद्दल अधिक जाणून घेऊयात.


Excitel 300 Mbps योजनेची किंमत किती? 


जर तुम्हाला थोडा फास्ट स्पीडचा इंटरनेट स्पीड हवा असेल तर तुम्हाला दरमहा 474 रुपये खर्च करावे लागतील. लक्षात घ्या की तुम्ही एकाच वेळी 12 महिन्यांची मेंबरशीप घेतली तरच तुम्हाला हा प्लॅन या किंमतीत मिळू शकेल. दोन्ही ब्रॉडबँड प्लॅन 6 महिने आणि 3 महिन्यांचे रेंट ऑप्शन्स देखील देतात.


या OTT ॲप्सचे फायदे


दोन्ही प्लॅनसह, कंपनी तुम्हाला 30 दिवसांसाठी एकूण 20 OTT ॲप्सची सदस्यता देईल. हे प्लॅन SonyLIV, SunNXT, ZEE5, Aha Telugu, Alt Balaji, RunnTV, Nammaflix, Play Flix, OmTV, Shorts TV आणि इतरांसह ॲप्समध्ये एन्ट्री देतात.


याकडेही लक्ष द्या 


या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुम्ही Excitel प्लॅन किंवा Jio ब्रॉडबँड प्लॅन खरेदी कराल तेव्हा तुम्हाला प्लानच्या किंमती व्यतिरिक्त 18 टक्के GST स्वतंत्रपणे भरावा लागेल. जसे की, समजा प्लॅनची ​​किंमत 424 रुपये आहे, तर GST नंतर या प्लॅनची ​​किंमत 500.32 रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही या अॅपचा लाभ घेऊ शकता. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Google Doodle Today : तुमच्या नात्यातील Bond कसा आहे? हे आता गुगल सांगणार; गुगलकडून 'व्हॅलेंटाईन डे'चं खास डूडल