Google Doodle Today : प्रेमाचा आणि आनंदाचा असा व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) आज जगभरात साजरा केला जातोय. याच निमित्ताने आज गुगलनेही डूडलच्या माध्यमातून आजचा दिवस साजरा केला आहे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुगलने एका छान डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. तसेच, एक गेमसुद्धा सादर केला आहे. खरंतर, गुगल दरवर्षी व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी गुगल डूडल गेम सादर करतं. यावर्षी देखील व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी तुमची आणि तुमच्या पार्टनरच्या एटॉमिक बॉन्डशी संबंधित एक क्विज गेम गुगलकडून सादर करण्यात आला आहे. 


गुगल डूडल क्विज गेममध्ये नेमकं काय आहे?


गुगलने यंदाचं व्हॅलेंटाईन डूडल हे विज्ञानाच्या एका ट्विस्टनुसार सादर केलं आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्विज खेळण्यासाठी आणि तुमचा केमिकल बॉन्ड निवडण्यासाठी अनेक ऑप्शन्स दिसतील. या डूडलच्या माध्यमातून तुम्हाला हे कळेल की, तुम्ही केमिस्ट्रीनुसार कोणत्या केमिकलशी संबंधित आहात? आणि तुमचा बॉन्ड कोणत्या केमिकलबरोबर छान तयार होऊ शकतो. तुम्ही सुद्धा या क्विजला गुगल डूडलवर क्लिक करून खेळू शकता. 


व्हॅलेंटाईन डे गुगल डूडल कसे खेळाल? 


सध्या तुमच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये दिसलेल्या गुगल डूडलच्या होम पेजवर दोन एटॉमिक बॉन्ड 'Cu Pd' असे दिसत असतील. हे एक कॉपर पॅलेडियम आहे. याच्याच बरोबर तुम्हाला एटॉमचे एटॉमिक नंबर सुद्धा देण्यात आले आहेत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही या क्विजमध्ये सहभाग देखील घेऊ शकता. तसेच, सहभाग घेऊन या एटॉमिक बॉन्डला बदलू देखील शकता. हा एक अत्यंत मजेशीर खेळ गुगल कडून सादर करण्यात आला आहे. 


व्हॅलेंटाईन डे निमित्त गूगल डूडलचा इतिहास


गुगलने 2012 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पहिल्यांदाच क्विझची सुरुवात केली होती. Google च्या मते, व्हॅलेंटाईन डे डूडल गेम एक मजेदार आणि परस्पर संवाद साधणारा असा एक खेळ आहे. गुगलने या प्रश्नमंजुषामध्ये विरुद्ध आकर्षणे असलेल्या दोन अणूंचा समावेश केला आहे. या प्रश्नमंजुषामध्ये व्यक्तिमत्त्वाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. तुम्ही हा खेळ कोणत्याही एका अणूने सुरू करू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Valentine Day Celebration Songs : 90 च्या दशकातील 'या' रोमँटिक गाण्यांनी साजरा करा तुमचा व्हेंलेंटाईन डे