boAt Aavante Bar Prime Soundbars: घरातील टीव्ही आवाज अधिक दमदार आणि प्रभावी येण्यासाठी साऊंडबार (Boat Soundbars) अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येकाच्या घरात होम थिएटर असेलच असं नाही. त्यामुळे चांगला ऑडिओ अनुभव देण्यासाठी साऊंडबार उपयोगी पडते. जर आपल्यालाही खिशाला परवडणारे साऊंडबार हवे असतील तर,  आणि तुम्ही उत्तम साऊंडबारच्या शोधात असाल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.  Boatया कंपनीचे आपण ब्ल्यूटुथ, हेडफोन्स वापरलेच असतील. आता Boatच्या Avante Bar Prime सिरीजमधील काही साऊंडबारचे (Technology) ऑप्शन्स पाहू शकता. 

Continues below advertisement

Boatच्या Avante Bar Primeरेंजमध्ये आपल्याला Aavante Bar Prime B450, Aavante Bar Prime DA600 आणि Aavante Bar Prime Thunder-D हे तीन खास ड्युअल सबवूफर  साऊंडबार आहेत, जे आपल्या उपयोगी पडतील. या तिन्ही मॉडेल्सची विशेष खासियत आहे. जे नक्कीच आपल्याला आवडतील.  या तिन्ही मॉडल्समध्ये काही विशेष फिचर्स आहेत. थंडर - डी ड्युअल सबवूफर्स,  5.2  चॅनेल ऑडिओ आणि रिअर सॅटेलाइट स्पीकर्स आहेत.  पण तिन्ही साऊंडबारमध्ये महत्त्वाचे फरक आहेत, जे या मॉडल्सना इतरांपेक्षा वेगळं करतात.   चला तर मग, या तिन्ही साऊंडबारची स्पेसिफिकेशन,  फिचर्स आणि  ओव्हरऑल सेटअप जाणून घेऊयात.

Aavante Bar Prime B450

Aavante Bar Prime B450 हा एक 450 W RMS पॉवर आऊटपुटसह येणारा 5.2 चॅनेल साऊंडबार आहे. याच्या ऑडिओ सेटअपमध्ये ड्युअल सबवूफर्ससोबत दोन रिअर सॅटेलाइट देण्यात आले आहे.  टीव्ही पाहत असताना  प्रभावी साऊंड क्वालिटी ऐकण्यास आपल्याला मदत मिळेल. ड्युअल फ्रिक्वेन्सीमुळे बास अधिक प्रभावी जाणवतो. तर, रिअर सॅटेलाइट स्पीकर्समुळे  साऊंड इफेक्टसाठी वेगळे ऑडिओ चॅनेल मिळतात.  स्टँडर्ड  स्टिरिओ आऊटपेक्षा अधिक  प्रभावी ऑडिओ अनुभवण्यासाठी हा सेटअप आपल्या उपयुक्त ठरु शकते. हा साऊंडबार टीव्ही, स्मार्टफोन आणि लॅपटॉप या डिवाईजमध्ये सहज कनेक्ट होऊ शकते.

Continues below advertisement

Aavante Bar Prime DA600

Aavante Bar Prime DA600 हा 600w boAt Signature Sound आऊटपुटसह येतो. यात विशेष ड्युअल सबवूफर्स, 5.2चॅनेल सेटअप आणि रिअर सॅटेलाइट स्पीकर्स देण्यात आले आहेत.  विशेष म्हणजे Dolby Atmos सपोर्टमुळे ऑडिओ ऐकताना आवाज अधिक प्रभावी ऐकू येतो.  ज्यांना घरबसल्या सिनेमा किंवा वेब सिरीज आवडते, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. यातून आपल्याला एक वेगळा अनुभव मिळेल यात शंका नाही. DA600 मध्ये विशेष सबवूफर, रिअर सॅटेलाइट स्पीकर्स आणि मुख्य साऊंडबार यांच्यात वायर्ड कनेक्शन देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात विविध पर्याय उपलब्ध आहेत.

Aavante Bar Prime Thunder-D

Aavante Bar Prime Thunder-D हा या सिरीजमधील आणखी एक 600W पॉवर असलेला खास पर्याय आहे. यात विशेषत: 5.2 कॉन्फिगरेशनसह 2 वायर्ड सबवूफर्स आणि दोन वायर्ड रिअर सॅटेलाइट स्पीकर्स देण्यात आले आहे. DA600 प्रमाणे यातही Dolby Atmos सपोर्ट मिळतो. यामुळे आपल्याला घरच्या घरी सिनेमॅटिक ऑडिओ अनुभव मिळते. विशेषत: साऊंडबार यासाठीच काम करते.   याचा सेटअपही सोपा ठेवण्यात आला आहे.  Thunder-Dमध्ये 5.25 इंच सबवूफर ड्रायव्हर्स आहे. तर, मुख्य साऊंडबारमध्ये चार इंच ड्रायव्हर आणि प्रत्येकी रिअर सॅटेलाईट स्पीकरमध्ये 1.5 इंच ड्रायव्हर देण्यात आलं आहे. कनेक्टिव्हिटीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. Thunder-Dमध्ये मुव्ही, बातमी आणि संगीत असे EQमोड्स देण्यात आले आहे. यासह फुल फंक्शन रिमोटही मिळतो.

प्राइज आणि हे तिव्ही प्रॉडक्ट कुठे मिळतील?

Aavante Bar Prime B450या साऊंडबारची किंमत 11,999 रुपये असून, हा साऊंडबार आपल्याला boAtच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल. तसेच हा प्रॉडक्ट आपल्याला अॅमेझॉनवरही मिळू शकेल.  शिवाय, Aavante Bar Prime DA600 याची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. हा साऊंडबार आपल्याला boAtच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. किंवा आपण Flipkartवरुनही खरेदी करु शकता. तर, Aavante Bar Prime Thunder-D या प्रॉडक्टची किंमत 10,999 ते 11,999 रुपये इतकी आहे. या रेंजमध्ये आपल्याला मिळून जाईल.   boAtच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा आपल्याला जवळच्या रिटेल स्टोअर्समध्ये हा प्रॉडक्ट आपल्याला मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs