Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Shilpa Shetty Ganeshotsav Visarjan: गणपती बाप्पांच्या विसर्जनावेळी शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज.
Continues below advertisement

Shilpa Shetty Farewell To Ganpati Bappa Visarjan
Continues below advertisement
1/8
बॉलिवूडमध्ये गणेश चतुर्थी हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. कलाकारांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. अनेक सेलिब्रिटी दरवर्षी गणपती बाप्पांचे स्वागत करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनं देखील दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या घरात गणपती बाप्पांचे स्वागत केले आहे. तसेच विसर्जनही केले आहे.
2/8
गणेश चतुर्थीच्या दिवशी शिल्पा शेट्टीने मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पांचे आपल्या घरी स्वागत केले आहे. मंगळवारी मोठ्या उत्साहात विसर्जन सोहळाही पार पडला.
3/8
शिल्पा शेट्टीच्या घरात दीड दिवसांसाठी गणपती बाप्पा येतात. दीड दिवसांच्या गणपती बाप्पांची तिने स्थापना केली होती. दीड दिवसांच्या गणपतीचे काल विसर्जन सोहळा पार पडला.
4/8
विसर्जनाच्या दिवशी शिल्पा शेट्टीने मराठी लूक कॅरी केला होता. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्रीने मनोभावे गणपती बाप्पांचे स्वागत केले होते. त्याच पवित्रतेने अभिनेत्रीने गणपती बाप्पांना निरोपही दिला.
5/8
गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्यावेळी पती राज कुंद्रा आणि कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. विसर्जनाच्या वेळेस अभिनेत्रीने आपल्या कुटुंबासोबत नृत्यही केले. या खास सोहळ्यानिमित्त ती एका कॅमेरमनसोबत नृत्य करताना दिसली.
Continues below advertisement
6/8
विसर्जनाच्या वेळेस अभिनेत्रीने स्वत: ढोल वाजवले होते. सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
7/8
गणेश विसर्जनादरम्यान शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत दिसली. अभिनेत्रीची धाकटी बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी देखील डान्स करताना दिसली.
8/8
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यानेही या मिरवणुकीत सहभाग घेतला. त्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. राज आणि शिल्पा यांची दोन्ही मुलं देखील डान्स करताना दिसले. दोघांनीही पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.
Published at : 16 Sep 2026 09:30 AM (IST)