Smartphone Charging Issue : सध्या सगळेच स्मार्टफोन वापरतात. त्यात सगळे (Smartphone) फोन विकत घेताना बॅटरी बॅकअप पाहून फोन खरेदी करतात. मात्र जसा जसा फोन जुना होतो. तसं फोनचं बॅटरी बॅकअप कमी होत जातो. शिवाय अनेकदा बॅटरी चार्ज होण्यासाठी त्रास होतो. अनेकदा आपण खिशात किंवा कोणत्याही धुळीच्या ठिकाणी ठेवतो त्यामुळे अनेकदा चार्जिंग पोर्टमध्ये धुळीचे कण साठतात आणि पोर्ट खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपला फोन चार्ज होत नाही किंवा चार्ज होण्यासाठी फार वेळ घेतो, असं काहीही होऊ नये म्हणून आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.



1. चार्जर आणि USB तपासा


 


सर्वात आधी तुमच्याकडे जे चार्जर आणि USB आहे ते चांगलं आणि सुरु आहे का? याची खात्री करून घ्या. कारणं तुमच्याकडे जुने चार्जर आणि USB असल्यास ते खराब झालेले असू शकतात. यामुळेच चार्जिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात.


2. चार्जिंग पोर्ट साफ करा किंवा चेक करून घ्या 


 


चार्जिंग पोर्टमध्ये अनेकदा धूळ आणि माती जाते किंवा कधी कधी कचराही जातो. यामुळे चार्जिंगमध्ये समस्या येऊ शकतात. चार्जिंग पोर्ट स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही स्वच्छ टूथब्रश किंवा कॉटन स्‍वॅब वापरू शकता. साफ करताना चार्जिंग पोर्टवर प्रेशर किंवा अधिक दाब देऊ नका. या शिवाय जर चार्जिंग पोर्ट हा खराब असेल तर त्यांचा परिणाम हा फोन चार्जिंगवर होऊ शकतो. त्यामुळे तो आधी चेक करू घ्या. जर तो खराब असेल तर दुरुस्त करून घ्या.


3. फोन फॉरमॅट रीसेट करा  


या सगळ्या गोष्टी  करुन झाल्या असतील तर, तुम्ही तुमचा फोन फॉरमॅट रीसेट करू शकता. फॉरमॅट आणि रीसेट केल्याने तुमच्या फोनचा सर्व डेटा आणि सेटिंग्ज डिलीट होतील. चार्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सगळ्या सेटिंग्ज कराव्या लागतील. 


4. फोनला अपडेट करा किंवा स्विच ऑफ करुन चार्ज करा


जर तुम्हाला फोन अपडेट आले असेल आणि तुम्ही ते केले नसेल तर त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. अपडेट केल्याने फोन फास्ट चार्ज होऊ शकतो. याशिवाय तुम्ही फोन स्विच ऑफ करून चार्ज करू शकता. स्विच ऑफ करू फोन फास्ट चार्ज होईल. काहीवेळा, फोन रीस्टार्ट केल्याने चार्जिंगची समस्या दूर होऊ शकते.


इतर महत्वाची बातमी-


Samsung Smart Ring : सॅमसंगची स्मार्ट रिंग चर्चेत; लहान अंगठी करणार AI सह हेल्थ ट्रॅकिंग, कसे असतील फिचर्स?