Oppo Reno 11 Pro 5G : Oppo Reno 11 Pro 5G  हा स्मार्टफोन काही (Oppo) दिवसांपूर्वीच लाँच  करण्यात आला आहे. या फोनवर बंपर डिस्काउंटही मिळत आहे. जर तुम्हीही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कारण आम्ही तुम्हाला फोनच्या स्पेसिफिकेशनपासून सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत. याशिवाय आम्ही सांगणार आहोत की फोन कुठे सर्वात स्वस्त मिळत आहे


OPPO Reno 11 Pro 5G (256GB+12GB RAM) फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनची एमआरपी 44,999 रुपये असून 11% डिस्काउंटनंतर तुम्ही 39,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच फोनवर अनेक बँक ऑफर्सही सुरू आहेत. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट मिळू शकते. कॅनरा बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर हीच सवलत उपलब्ध आहे.


एक्सचेंज ऑफरमध्येही ऑफर सुरु आहे. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास 37,730 रुपयांची सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असायला हवी. हे जुन्या फोन मॉडेलवर देखील अवलंबून आहे. स्पेसिफिकेशनचाही जास्त विचार करण्याची गरज नाही.


फोनमध्ये6.7 Inch Full HD+ Display देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP  आहे. दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा तर तिसरा कॅमेरा 32MP चा आहे. फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा आहे. हा फोन 4600 mAh बॅटरीसह येतो, ज्यामुळे तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअपदेखील मिळतो. यात मीडियाटेक डायमेंसिटी 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यामुळे फोनचा स्पीडही चांगला आहे.


2 पेरिस्कोप कॅमेरे असलेला फोन लाँच 


ओप्पोने  Oppo Find X7 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा जगातील पहिला असा फोन आहे ज्यामध्ये कंपनीने 2 पेरिस्कोप कॅमेरे दिले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये जगातील सर्वात मोठा टेलिफोटो सेन्सर असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉमची लेटेस्ट चिप देण्यात आली आहे. सध्या कंपनीने हा फोन फक्त चीनमध्ये लाँच केला आहे. भारतात हा फोन लाँच होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ओप्पो फाइंड एक्स 7 अल्ट्रा कंपनीने 12/256G, 16/256GB आणि16/512GB अशा 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला आहे.


इतर महत्वाची बातमी-


Neeta Ambani Mobile : निता अंबानी कोणता मोबाईल वापरतात माहितीये का? किंमत पण जाणून घ्या!