iPhone 12 discount :  iPhone 12 लाँच होऊन बराच काळ लोटला आहे. तरीसुद्धा हा फोन आत्ताही ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हीसुद्धा हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. सोबतच या फोनमध्ये मिळत असणारे फिचर्स देखील चांगले आहेत. चला तर जाणून घेऊया 50,000 रुपयांचा फोन तुम्ही 23,000 रुपयांमध्ये कसा काय खरेदी करू शकता? कोणते नेमके ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात? पाहुयात...


Apple IPhone 12 (64GB) तुम्ही फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करू शकता. या फोनची किंमत 49,900 रुपये एवढी आहे आणि यात तुम्हाला 13 टक्के डिस्काउंट मिळाल्यानंतर 42,999 रुपयांमध्ये तुम्ही तो खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक बँकेचे ऑफर मिळू शकतात. आता Flipkart Axis Bank Card वरून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. या सोबतच तुम्हाला त्यावर एक्सचेंज ऑफर देखील मिळते.


जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केला तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 20,300 एवढं डिस्काउंट मिळू शकतं. मात्र एवढं डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची कंडीशन चांगली असली पाहिजे. सोबतच तुमचा जुना फोन आणि ते मॉडेल कसले आहे, हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. जर तुमचा जुना फोन चांगल्या परिस्थितीत असेल आणि मॉडेल चांगले असेल तर, अर्थातच तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकणार आहात. अशातच ही ऑफर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. 


याच्या स्पेसिफिकेशनचा जास्त विचार करण्याची देखील तुम्हाला गरज नाही. कारण या फोनमध्ये 6.1 इंच Super Retina XDR Display देण्यात आला आहे. अर्थात या डिस्प्लेमुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे, ज्यामध्ये याचा प्रायमरी कॅमेरा 12MP एवढा आहे. A14 Bionic Chip मुळे या फोनची स्पीड सुद्धा खूप चांगली आहे. हा फोन 5G ला सपोर्ट करतो, म्हणजेच लेटेस्ट नेटवर्कला सुद्धा सपोर्ट करणारा हा फोन असणार आहे.


फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल, स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट!


ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक उत्पादनांच्या खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही ऑफर्सचा खुलासा कंपनीने केला आहे.फ्लिपकार्टने या सेलसाठी एक मायक्रो पेज तयार केले आहे, ज्यामध्ये सेलमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हे ऑफर्स प्रॉडक्टनुसार असेल. ई-कॉमर्स वेबसाइटवरील या सेलमध्ये इयरबड्स आणि इयरफोन्स 599 रुपयांना मिळणार आहेत. याशिवाय 399 रुपयांना ट्रिमर खरेदी करता येणार आहेत.


एवढंच नाही तर सेलमध्ये बेस्ट सेलिंग लॅपटॉप 12,990 रुपयांपासून खरेदी करता येणार आहे. बिग बचत धमाल सेलच्या लँडिंग पेजवर रियलमी, पोको, विवो आणि आयफोन लिस्ट करण्यात आले आहेत. सेलमध्ये लवकरच या ब्रँडच्या फोनवर ऑफर्स जाहीर केल्या जातील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने गेल्या वर्षी फेस्टिव्ह सीझन सेलदरम्यान स्मार्टफोन खरेदीवर चांगली ऑफर दिली होती. स्मार्टफोन व्यतिरिक्त स्मार्ट टीव्ही 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. एवढंच नाही तर वॉशिंग मशीन तुम्ही 6,990 रुपयांपासून घरी आणू शकाल. सध्या नवीन वर्षात अनेक सेल ओपन होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या अॅप्सवर सेल सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणती वस्तू विकत घ्यायची असेल तर हे सगळे सेल पाहून स्वस्त्यात खरेदी करा.


महत्वाच्या इतर बातम्या :


Aditya L1 : भारत आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज! आदित्य L-1 ची आज खरी परीक्षा, ISRO नं दिली माहिती