Government Remove 36 Thousand Links :  सोशल मीडिया आणि  वेबसाईट संदर्भात सरकार (Social Media) सातत्याने कठोर पावलं उचलत असते. नुकतेच सरकारने मोठे पाऊल उचलत एका झटक्यात 36 हजारांहून अधिक लिंक ब्लॉक केल्या आहेत. खरं तर सोशल मीडियावरील पोस्ट पाहून ही कारवाई करण्यात आली आहे. अशा लिंकची आधी ओळख पटविण्यात आली आणि त्यानंतर त्यावर कडक कारवाई करून हे पाऊल उचलण्यात आले आहे.


इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया कंपनीचे 36,838 यूआरएल काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ही यूआरएल 2018ते ऑक्टोबर 2023या कालावधीत करण्यात आली होती. आता यावर कारवाई करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यातील बहुतांश लिंक्स 'X' शी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले.


4,999 यूट्यूब लिंक्सवर कारवाई



अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी युट्युबवरही अशीच कारवाई करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने सांगितले होते की, आतापर्यंत 4,999 यूट्यूब लिंक काढून टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईत व्हिडिओ आणि चॅनेलही हटवण्यात आले. अशापरिस्थितीत आता सोशल मीडिया पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे.


स्मृती इराणी यांच्याविरोधातील मजकूर हटवला!


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या लिंक्स कारवाई करण्यात आल्याचे गुगलने दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले होते. त्यांनी स्मृती इराणी यांना अशा वेबसाइट्सच्या लिंकही विचारल्या होत्या. जर त्यांनी अशा लिंक ्स दिल्या तर ती ताबडतोब असा मजकूर ब्लॉक करेल. आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार सरकारला आहे.  त्यामुळे सरकारने या सगळ्या लिंक्स ब्लॅक केल्या होत्या. 


अॅप्सवरदेखील कारवाई


 सध्या सायबर क्राईमचं प्रमाण वाढत आहे. अनेक लिंक्स किंवा अॅप्स वापरुन लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आता सरकारने या विरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे.  लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 17 अॅप गुगल प्लेस्टोरवरुन काढून टाकल्या आहेत.  AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash या अॅप्स काढून टाकण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Earbuds Under 2000 : स्वस्त आणि दमदार Earbuds च्या शोधात आहात? पाहा स्वस्त TWS Earbuds ची List; किंमत 2000 रुपयांपेक्षाही कमी!