मुंबई : WhatsApp चे जगभरात 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. कंपनी वेळोवेळी अॅपमध्ये नवनवीन अपडेट्स आणत असते. काही महिन्यांपूर्वी, व्हाट्सएपने (WhatsApp) अॅपमध्ये चॅनेलचे फिचर सुरु करण्यात आले होते.  ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडत्या निर्माते, सेलिब्रिटी आणि संस्थांशी नंबरशिवाय कनेक्ट करण्याची परवानगी मिळाली. आता कंपनी चॅनलमध्ये काही नवीन फीचर्स जोडणार आहे. तुमचेही व्हॉट्सअॅप चॅनल असेल तर जाणून घ्या याविषयी सविस्तर 


व्हॉट्सअॅपच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइट Wabetainfo नुसार, कंपनी चॅनलसाठी 3 नवे अपडेट्स आणत आहे.  ज्यात चॅनल अलर्ट, नेव्हिगेशन  लपवणे आणि तारखेनुसार मेसेज शोधण्याची सुविधा समाविष्ट आहे. तुम्हाला चॅनलच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट मेनूमध्ये 'चॅनेल माहिती' अंतर्गत चॅनेल अलर्ट आढळतील. येथे तुम्हाला अपडेट्स मिळतील जे तुम्हाला सांगतील की तुम्ही चॅनलमध्ये कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. सध्या अनेकांचे हे व्हॉट्सअॅप चॅनल आहे. त्या माध्यामातून लोकं त्यांचं काम लोकांपर्यंत पोहचवत असतात. त्यामुळे हे फिरच अनेकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचं पहायला मिळतंय. 


याशिवाय, स्क्रीन खाली स्क्रोल करताना नेव्हिगेशन स्तर आणि टॉप बार काढून टाकण्यासाठी कंपनी अॅपमध्ये एक नवे फिचर जोडत आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही आता तारखेनुसार चॅनेलमधील मेसेज देखील शोधू शकणार आहात.  सध्या, हे अपडेट्स व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत जे लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होऊ शकतात.


स्टेटस अॅप देखील होणार अपडेट 


सोशल मीडिया प्लॅटफोर्म असणारी दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. स्टेटस टॅबमध्ये तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा लवकरच तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये असे काय होते की, जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते.पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या विकासावर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे अॅप वापरणं अधिक सोप होणार आहे. 


हेही वाचा : 


Smartphone : ठरलं! OnePlus 12 5G स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च; काय आहेत स्पेशल फिचर्स? किंमत किती? सर्व माहिती एका क्लिकवर...