Fast Mobile Charging Hacks : सध्या सगळेच आपण(Mobile Charge) कायम आपला मोबाईल वापरत असतो. कधी व्हिडीओ बघतो तर कधी तासनतास रिल्स बघत बसतो. त्यामुळे मोबाईलची चार्जिंग महत्वाच्या कामाच्या वेळी कमी होते. घरात किंवा ऑफिसमध्ये आपण लगेच चार्ज करु शकतो. मात्र बाहेर काम करत असाल आणि मोबाईल फास्ट चार्ज करायचा असेल तर अनेक मोबाईल लवकर चार्ज न होत असल्याने अनेकांची चिडचिड होते. स्मार्टफोन चार्ज करताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण एका चुकीमुळे तुमचे डिव्हाइस ही खूप खराब होऊ शकतो. आम्ही तुम्हाला अशा काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला स्मार्टफोनची चार्जिंग फास्ट चार्ज करण्यास मदत मिळेल. 


ओरिजीनल चार्जर वापरा : आपल्याला आपल्या डिव्हाइससाठी फास्ट चार्जिंग हवे असल्यास, नेहमीच फोन सोबत मिळालेला चार्जर वापरा, कारण ओरिजीनल चार्जर वापरल्यास डिव्हाइस फास्ट चार्ज होते. 


डिव्हाइस बंद करा : चार्जिंग दरम्यान डिव्हाइस बंद करणे हा एक फायदेशीर उपाय असू शकतो, कारण यामुळे डिव्हाइसचा वापर कमी होतो आणि चार्जिंग स्पीड वाढू शकतो.


एरोप्लेन मोड वापरा : डिव्हाइसचे चार्जिंग फास्ट चार्ज करायचे असेल तर चार्जिंग दरम्यान एरोप्लेन मोड वापरणे हा आणखी एक पर्याय आहे. यामुळे डिव्हाइसची सर्व नेटवर्क अॅक्टिव्हिटी बंद होते आणि चार्जिंग स्पीड वाढते.


थंड जागेचा वापर करा : डिव्हाइसचार्जिंग करताना थंड जागी ठेवल्यास मोबाईल फास्ट चार्ज होऊ शकतो, कारण उन्हाळ्यात डिव्हाइस लवकर गरम होते, ज्यामुळे चार्जिंग स्पीडवर परिणाम होऊ शकतो.


त्यासोबतच अनेकदा आपल्या मोबाईलचा अति वापर झाला तर फोन हिट होतो म्हणजेच गरम होतो. त्यावेळी नेमकं काय करायचं ते ही पाहूयात...


-मोबाईल थोड्या फार प्रमाणात गरम होणं, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. मात्र, मोबाईल जास्त गरम झाल्यास भीती असते. अशावेळी मोबाईल खिशातून काढून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यावा.


-चार्जिंग करत असताना मोबाईल गरम झाल्यास थोड्या वेळासाठी चार्जिंग बंद करणं मोबाईलसाठी फायद्याचं ठरतं. मात्र, चार्जिंग कॉडच खराब असेल तर कॉड बदलल्याशिवाय उपाय नाही.
 
-मोबाईल वारंवार गरम होत असल्यास मोबाईल कंपनीकडे तक्रार करायला हवी. शिवाय, सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल दाखवायला हवा. ज्यामुळे मोबाईलच्या सुरक्षेबाबत तुम्ही निश्चिंत राहू शकता.


-सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर फोनवर बोलू नये तसेच मोबाईलचा वापर देखील चार्जिंग सुरु असताना करणं धोकादायक ठरु शकतं. 


इतर महत्वाची बातमी-


Best Prepaid Plans : Jio आणि Airtel चे भन्नाट प्लॅन्स; भरपूर डेटासह मिळणार 15 OTT प्लॅटफॉर्म फ्री