Best Prepaid Plans : आजकाल स्मार्टफोन वापरणारे युजर्स आपल्या (Tech news) रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेट डेटाच नव्हे तर ओटीटी (OTT) अॅप्सचे सब्सक्रिप्शनदेखील बघत आहे. यामुळे देशातील सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्सना अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये इंटरनेट डेटासह ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देतात. तुम्हीही असाच रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एअरटेल (Airtel) आणि जिओच्या (Jio) रिचार्ज प्लॅनबद्दल सांगत आहोत. ज्यात 28 दिवसांसाठी भरपूर डेटा मिळतो आणि भरपूर ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळतं. कोणते आहेत हे प्लॅन्स? पाहूयात...


Airtel चा 28  दिवसांचा प्रीपेड प्लान


एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर युजर्संना 28 दिवसांसाठी ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन असलेला प्लॅन खरेदी करण्यासाठी 499 रुपये खर्च करावे लागतील. एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोमिंग, डेली 100 SMS आणि दररोज 3 GB इंटरनेट डेटासह अनेक खास फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा, एअरटेल एक्सट्रीम प्ले  (Sony LIV, Lionsgate Play, Fancode, Eros Now, Hoichoi, ManoramaMAX) सोबत15 हून अधिक ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन, 3 महिन्यांसाठी डिस्ने प्लस हॉटस्टारचे मोबाइल सब्सक्रिप्शन, 3 महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कल, विंक म्युझिक आणि फ्री हॅलोट्यून्स मिळतात.


 


JIO चा 28  दिवसांचा प्रीपेड प्लान



JIO चा रिचार्ज प्लान 398 रुपयांचा आहे. जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 28 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस तसेच इतर अनेक फायदे मिळतात. जिओच्या या प्लॅनसोबत युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटाही मिळतो. याशिवाय युजर्संना सोनी लिव्ह, झी 5, जिओ सिनेमा प्रीमियम,Lionsgate Play, Discovery Plus सोबत एकूण 12 ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. 


एअरटेलचा 2999 मध्ये वर्षभर फ्री कॉल्स आणि 2 GB डेटा


त्यासोबत दोन्ही कंपन्यांचे वर्षभरासाठी असलेले प्लॅन्सदेखील चांगले आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील काही काळासाठी फ्री मिळतात. सध्या रिचार्ज महाग झाले अशी तक्रार अनेक युजर्स करत असतात. मात्र त्यांना याच पैशात आता OTT सब्सक्रिप्शनदेखील मिळणार आहे. वर्षभराचा प्लॅन घेतला तर जास्त स्वस्त आणि चांगलादेखील पडतो. एअरटेलचा 2999 मध्ये वर्षभर फ्री कॉल्स आणि 2 GB डेटा मिळणार आहे.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


FASTag : आजच करा 'हे' काम नाहीतर, 31 जानेवारीनंतर बंद होणार फास्टॅग; फास्टॅगसाठी KYC अपडेट कसं करावं?