Threads Account Delete : मेटाच्या (Meta) मालकीचे असलेले थ्रेड्स अॅप (Threads App) आतापर्यंत 70 मिलियनहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. अत्यंत कमी कालावधीत सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेलं हे अॅप असल्यामुळे या अॅपने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. खरंतर, Threads या अॅपच्या बाबतीत यूजर्सच्या मनात एक चिंता होती की, हे अॅप इन्स्टाग्रामशी (Instagram) कनेक्ट असल्यामुळे दोघांची सेटिंग्ज सारखीच आहेत. म्हणजेच, जर तुम्ही थ्रेड्स अकाऊंट डिलीट केले तर Instagram अकाऊंट देखील डिलीट होईल. याबाबत सोशल मीडियावर जोरदार वाद सुरु होता. यावर आता इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी एक थ्रेड पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की कंपनी लवकरच लोकांना हे अपडेट देईल की यूजर्स त्यांचे अकाऊंट स्वतंत्रपणे डिलीट करू शकतील. म्हणजेच, तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचंं नुकसान न होता तुम्ही थ्रेड्स अकाऊंट डिलीट करू शकणार आहात. मात्र, सध्या यूजर्स फक्त हे अॅप डिएक्टिव्हेट (Deactivate) करू शकतात.

  


थ्रेड्स अकाऊंट डिएक्टिव्हेट करण्यासाठी, तुम्हाला प्रोफाईल सेक्शनमध्ये जावं लागेल आणि अकाऊंटवर क्लिक करावं लागेल. येथे तुम्हाला Account Decactivate चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. जेव्हा तुमचं अकाऊंट डिएक्टिव्हेट केलं जाईल तेव्हा तुमचे प्रोफाईल, थ्रेड पोस्ट इत्यादी इतर यूजर्सना दिसणार नाहीत. 


खरंतर, इन्स्टाग्राममुळे थ्रेड्सचा यूजरबेस फार मोठ्या संख्येने वाढला आहे. कारण कंपनीने हे अॅप इन्स्टाग्रामशी थेट जोडले आहे. इंटीग्रेशनमुळे इन्स्टाग्राम यूजर्सने थ्रेड्सवर देखील स्विच केले आहे.


अनेक नवीन फिचर्सवर काम सुरु 


नुकतेच सुरु करण्यात आलेल्या थ्रेड्स या अॅपमध्ये सध्या ट्विटरवर जे फिचर्स उपलब्ध आहेत ते थ्रेड्स अॅपवर उपलब्ध नाहीत. याच संदर्भात इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी सांगितले की, कंपनी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. फॉलोईंग ऑप्शन, ट्रेंड, रिकमेंडेशन, अॅक्टिव्हिटी पब प्रोटोकॉल यांसारखे नवीन फिचर्स लवकरच यूजर्सना उपलब्ध करून दिले जातील. पुढील आठवड्यापर्यंत, कंपनी अॅपमधील त्रुटी आणि सर्व दोष दूर करणार आहे. तर, Threads ने Play Store वर अॅपचं बीटा व्हर्जन देखील लॉन्च केलं आहे. तुम्हाला अॅपशी संबंधित सर्व अपडेट्स आधी मिळवायचे असतील, तर तुम्ही बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


सॅमसंग M सीरिजचा बजेटफ्रेंडली स्मार्टफोन Galaxy M34 भारतात लाँच; फास्ट चार्जिंग सपोर्टसह 'हे' आहेत भन्नाट फिचर्स