Instagram Facebook News : सध्या सोशल मीडियासाठी सरकार नवनवे नियम आणत असतात. सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता Instagram, Facebook वरील काही खात्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपासून बंद असलेले किंवा एकही अॅक्टिव्ह नसलेले अकाऊंड थेट डिलीट केले जाणार असल्याची माहिती आहे.
हा प्रस्ताव डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याचा भाग आहे, जो या वर्षी ऑगस्टमध्ये कायद्यात रूपांतरित झाला. हा वापरकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय असून यावर सातत्याने कारवाईचे नियोजन केले जात आहे. सोशल मीडियावर बनवलेला हा नियम ईकॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस, गेमिंग कंपन्या आणि सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू होऊ शकतो. यामुळे भारतातील युजर्सची संख्याही स्पष्ट होणार आहे.
सोशल मीडियावर सरकारची कारवाई
भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सरकारला सोशल मीडिया कंपन्यांकडून अभिप्राय मिळाला होता. जर भारतातील एखाद्या सोशल मीडिया युजर्सची माहिती मिळवायची असेल किंवा एकूण सोशल मीडिया युजर्सची माहिती मिळवायची असेल तर असे बंद असलेले सगळे अकाऊंट बंद करण्याची गरज आहे. त्यामुळे आता बंद असलेले सगळे अकाऊंट्स डिलीट होण्याची शक्यता आहे.
जीमेलदेखील बंद होणार
जर तुम्ही बराच काळ गुगल अकाऊंटमध्ये लॉग इन केले नसेल तर तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. जर तुम्ही सतत जीमेल वापरत असाल तर तुम्ही जीमेलचे अॅक्टिव्ह युजर्स आहात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अशा व्यक्तीचे जीमेल अकाऊंट डिलीट केले जाणार नाही आहे. जर तुम्ही बराच काळ जीमेल अकाऊंट वापरले नसेल तर तुमचा डेटा डिलीट होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचे जीमेल अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करून तुमचा डेटा डिलीट करायचा नसेल तर तुम्ही जीमेल डेटा सेव्ह करावा. नाहीतर तुमचा सगळा डेटा डिलीट होऊ शकतो. विशेष म्हणजे गुगलच्या नव्या पॉलिसीमध्ये शाळा किंवा बिझनेस वर्ल्डच्या गुगल आणि जीमेल अकाऊंटचा समावेश नाही. गुगलच्या मालकीच्या जीमेल, ड्राइव्ह, डॉक्स, मीट, कॅलेंडर आणि फोटोज सारख्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीतून यूट्यूब आणि ब्लॉगरला वगळण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे.
इतर महत्वाची बातमी-