10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमत आणि दमदार बॅटरी स्मार्टफोन
शाओमी रेडमी 3s प्राइम : 8 हजार 999 रुपये किंमतीच्या या फोनमध्ये 4100mAh दमदार क्षमतेची बॅटरी आहे. तर 3 जीबी रॅम, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेडमी नोट 3 : या फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी, 2 जीबी रॅम, 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तर किंमत 9 हजार 999 रुपये एवढी आहे.
स्मार्टफोन खरेदी करताना बॅटरी बॅकअपचा फोन शोधणं, त्यात बजेट फोन असणं हे मोठं आव्हान असतं. मात्र सध्या बाजारात 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत दमदार बॅटरी बॅकअप असलेले स्मार्टफोन आहेत.
मोटो E3 पॉवर : 7 हजार 999 रुपये किंमतीच्या या फोनमध्ये 3500mAh क्षमतेची बॅटरी आहे. तर 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.
मेझू M3 नोट : या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये असून यामध्ये 4100mAh एवढ्या दमदार क्षमतेची बॅटरी आहे. तर 3 जीबी रॅम आहे.
आसुस जेनफोन मॅक्स : या फोनची किंमत 9 हजार 399 रुपये आहे, तर 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. 2 जीबी रॅम, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असे फीचर्स आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -