रिलायन्स जिओची मोफत डेटा ऑफर मार्चनंतर पुन्हा वाढणार?
एअरटेलच्या ऑफरनंतर आयडिया आणि व्होडाफोननेही नवीन ऑफर आणल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिओने हॅप्पी न्यू इयर ऑफरची घोषणा केल्यानतंर एअरटेलने दोन प्लॅन लाँच केले. 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबी 4 जी डेटा आणि एअरटेल-एअरटेल मोफत व्हॉईस कॉलिंग सेवा दिली आहे. तर 345 रुपयांमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत एसटीडी कॉल आणि 4 जी डेटा दिला आहे.
एअरटेलने ऑफर देणं हा घाईमध्ये घेतलेला निर्णय आहे. कारण सध्या एअरटेलचे ग्राहक जिओला पर्याय म्हणून पाहत आहेत, असं रेलीगेअरने म्हटलं आहे.
ग्राहकांनी पाठ दाखवू नये, यासाठी एअरटेलने नुकतीच ऑफर लाँच केली आहे, असं राजीव शर्मा म्हणाले.
इतर दूरसंचार कंपन्यांनी डेटा प्लॅन स्वस्त केल्यास रिलायन्सकडून जिओची ऑफर आणखी वाढवली जाऊ शकते, असं टेलिकॉम अॅनालिस्ट राजीव शर्मा यांनी 'इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
जिओच्या स्पर्धक कंपन्यांनी डेटा दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिओही आणखी विस्तार करण्यासाठी ऑफर वाढवण्याचा विचार करेल, असं रेलीगेअर या मार्केंटिंग एजन्सीचं म्हणणं आहे.
रिलायन्स जिओने 31 डिसेंबरपर्यंतची वेलकम ऑफर वाढवून हॅप्पी न्यू इयर या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 31 मार्च 2017 पर्यंत मोफत डेटा सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही ऑफर पुन्हा वाढू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -