Samsung Upcoming Phones: Galaxy S23 सीरीज लॉन्च केल्यानंतर कोरियन कंपनी Samsung भारतात 2 मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Samsung 16 मार्च रोजी भारतात Galaxy A54 आणि Galaxy A34 लॉन्च करणार आहे. A सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन 5G सपोर्टेड असतील आणि 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होतील. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही स्मार्टफोनची किंमत 30,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र स्टोरेजनुसार ही किंमत अधिक असू शकते.
Samsung Upcoming Phones: मिळू शकतात हे फीचर्स
Samsung Galaxy A54 5G बद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.4 इंच फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाईल फोन Exynos 1380 चिपसेटवर काम करेल, ज्यामध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर मोबाईल फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर IOS सपोर्टसह असेल. समोर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा आढळू शकतो.
Samsung Galaxy A34 5G बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर सह येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. मोबाईल फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आढळू शकते, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
OnePlus 11R शी होणार स्पर्धा
OnePlus 11R दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या बेस मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे आणि 16GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 44,999 रुपये आहे. फोनसाठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि 28 फेब्रुवारीपासून डिव्हाइस खरेदीसाठी उपलब्ध होईल. फोन सोनिक ब्लॅक आणि गॅलेक्टिक सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
14 मार्च रोजी पोको लॉन्च करणार बजेट स्मार्टफोन
Poco 14 मार्च रोजी भारतात Poco x5 5G मोबाईल फोन लॉन्च करेल. याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला Snapdragon 695 SoC आणि 5000 mAh बॅटरी मिळेल. मोबाईल फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.