Samsung Mobile : जर तुम्हीही सॅमसंग युजर असाल तर ही (Samsung)बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण भारत सरकारने सॅमसंग युजर्ससाठी एक इशारा दिला आहे. युजर्सच्या सुरक्षेशी संबंधित हे इशारे देण्यात आले आहेत. यामध्ये सॅमसंग स्मार्टफोनच्या सुरक्षेसंदर्भात अनेक गोष्टी भारत सरकारकडून सांगण्यात आल्या आहेत.  Computer Emergency Response Team ने हाय रिस्क अलर्ट जारी केला आहे. 


भारत सरकारने  CERT-IN च्या वतीने एक इशारा जारी केला आहे की,  Samsung Mobile Android Versions 11, 12, 13 आणि 14 हे व्हर्जन्स अनेकांसाठी धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. CERT-In  संशोधकाला असं कळलं की सॅमसंगच्या या सगळ्या व्हर्जंन्समुळे सायबर क्राईमचे धोके अधिक आहेत. 


तुम्ही बचाव कसा करू शकता?


सिक्युरिटी अपडेट : युजर्सने सिक्युरिटी अपडेट्स लागू करावेत. सॅमसंगने नुकतीच सिक्युरिटी अॅडव्हायजरी जारी केली आहे. सेटिंग्समध्ये सॉफ्टवेअर अपडेटमध्ये गेल्यानंतर तुम्ही अपडेट तपासू शकता आणि नवं अपडेट असेल तर के करु शकता आपण सतत अपडेटबद्दल तपासावे आणि ते फोनमध्ये त्वरित इन्स्टॉल करावे.


कोणतंही अॅप डाऊनलोड करु नका 


सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोन वापरताना तुम्ही खूप काळजी घ्या. कोणतेही अनोळखी अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या.


फोन अपटेड ठेवा


अनेक अॅप्समध्ये नवे अपडेट्स येत असतात. ते अपडेट आल्यावर मोबाईल लगेच अपडेट करुन घ्या नाही तर हे सायबर भामटे जुन्या अॅप्सवर अटॅक जास्त प्रमाणात करत असतात. हे जुने व्हर्जन्स असलेले अॅप्स धोकादायक असतात. त्यामुळे अपडेट करायला विसरु नका. सॅमसंग गॅलेक्सी एस 23 सीरिज, गॅलेक्सी फ्लिप 5, गॅलेक्सी फोल्ड 5 सीरिजला देखील धोका आहे. तुम्हीही हे स्मार्टफोन वापरत असाल तर या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.


हॅकर्स आणि स्कॅमर्स लक्ष्य करू शकतात


इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असलेल्या, CERT-In च्या मते, या वल्नरबिलिटीच्या मदतीनं, हॅकर्स आणि स्कॅमर Android स्मार्टफोनमधील संवेदनशील डेटा एक्सेस करू शकतात आणि बँक खात्यांमध्ये प्रवेश देखील करू शकतात.


फोनमध्ये असतो महत्त्वाचा डेटा अन् बँक डिटेल्स 


स्मार्टफोन हा आपल्या जीवनशैलीचा एक आवश्यक भाग आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये आपला खासगी डाटा असतो. ज्यामध्ये बँक डिटेल्स, OTP आणि वैयक्तिक डेटा असतो. हॅकर्स किंवा स्कॅमर डिव्हाइस हॅक करू शकतात आणि त्यातून महत्त्वाचा डेटा, फोटो आणि अगदी बँक खाती काढून टाकू शकतात.


इतर महत्वाची बातमी-


Realme C67 5G Price: Realme C67 5G लाँच, 5000एमएएच बॅटरी आणि 50 MPकॅमेरा स्वस्तात मिळणार, जाणून घ्या किंमत!