Samsung Galaxy A23 5G : सध्या सगळीकडेच अनेक वेबसाईटवर वेगवेगळ्या मोबाईलवर मोठे ऑफर्स देण्यात येत आहे. बिग बिलियन डे नंतर आता ब्लक फ्रायडे सेल सुरु आहे. या सेलमध्ये सगळ्याच जास्त मोबाईलची विक्री होत असल्याची माहिती आहे. त्यासोबत विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही विकल्या जात आहे. त्यातच या सगळ्या (Samsung Galaxy A23 5G) वेबसाईट सोडून थेट सॅमसंगच्या वेबसाईटवर तुमच्यासाठी जोरदार ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्ही गॅलेक्सी A सीरिजचा लोकप्रिय Samsung Galaxy A23 5G  बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. 8 GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 30,990 रुपये आहे.


सॅमसंग वीक ऑफरमध्ये तुम्ही 6,991 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही मिळणार आहे.


या दोन ऑफर्समुळे फोनवरील एकूण डिस्काउंट 8,991 रुपयांपर्यंत होतो. त्याचबरोबर सॅमसंग अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना कंपनी 10 टक्के कॅशबॅक देखील देत आहे. याशिवाय PAYTM आणि MobiKwik वॉलेटवरून पेमेंट केल्यास 3,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ही बंपर ऑफर 3 दिवसांत संपणार आहे.


या फोनचे फिचर्स काय?


सॅमसंगच्या या फोनमध्ये तुम्हाला 1080x2408 पिक्सल रिझोल्यूशनअसलेला 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा इन्फिनिटी V डिस्प्ले 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास देखील देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा सेटअप जबरदस्त आहे. यात एलईडी फ्लॅशसह चार रियर कॅमेरे आहेत. यामध्ये 50 MP मेन लेन्ससह 5 MPचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 MP मॅक्रो आणि 2 MP ची डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.


सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAhची आहे, जी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये अँड्रॉइड 12 वर आधारित OneUI 4.1.1ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी WiFi 802.11 a/b/g/n/ac 2.4G+5GHz, VHT80, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 MM हेडफोन जॅक सारखे पर्याय उपलब्ध आहे.


इतर महत्वाची बातमी-


Cyber Crime Complaint : सायबर भामट्यांकडून फसवणूक, घरबसल्या कशी कराल तक्रार; संपूर्ण स्टेप्स एका क्लिकवर...