Mobile Charging Tips :  सध्या सगळ्याच वयोगटातील लोक प्रचंड (Mobile Charging Tips) प्रमाणात मोबाईलचा वापर करत असतात. त्यात सगळी कामं आटपून आपल्यातील अनेक लोक रात्रीच्या वेळी मोबाईल वापरतात. त्यावर अनेक व्हिडीओ, रिल्स बघत बसतात. त्यात रात्री अनेकजण एक चूक करतात. जी चूक आपल्यातील अनेकांना चांगलीच महागात पडू शकते. ही चूक आयुष्यभरासाठी पश्चात्तापदेखील देऊ शकते. ही चूक नेमकी कोणती आणि यापासून बचाव करायचा असेल तर काय करावं पाहूयात...


खरं तर आजचा स्मार्टफोन केवळ मेसेज, कॉलपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता मोबाईलवर चित्रपट, व्हिडिओ आणि अनेक वेबसाईट्स पाहता येणार आहेत. अशा तऱ्हेने अनेकजण रात्रीच्या वेळीही याचा भरपूर वापर करतात. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी स्मार्टफोन जवळ किंवा उशीखाली ठेवून झोपत असाल तर ते खूप धोकादायक सिद्ध होते.


अनेक कंपन्यांनी दिले इशारे


मोबाईल उशीखाली किंवा गरम ब्लँकेट वगैरे खाली ठेवून चार्ज केला जातो. त्यामुळे उशीखाली मोबाईल ठेवून चार्ज करुन नका, अशी माहिती APPLE कंपनीने आधीच दिली आहे. त्यामुळे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि मोबाइलच्या बॅटरीला आग लागू शकते. अशावेळी घरात आग लागू शकते आणि तुमचा जीव जाऊ शकतो.


मोबाईलच्या बॅटरीला आग का लागते?


खरं तर स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. हा एक ज्वलनशील पदार्थ आहे, ज्याला पेट्रोलप्रमाणे खूप लवकर आग लागते. अशावेळी जर तुम्ही स्मार्टफोन चार्ज करत असाल आणि चार्जिंग दरम्यान तो हवेशीर ठिकाणी ठेवावा. चार्जिंगदरम्यान स्मार्टफोन अनेकदा गरम असतात. जर त्याला खोलीत मोकळ्या हवेशीर ठिकाणी ठेवले तर व्हेंटिलेशनत्याच्या बॅटरीचे तापमान नियंत्रित करेल. जर आपण ते उशीखाली किंवा इतर कोणत्याही गोष्टीखाली ठेवले तर बॅटरी खूप गरम असताना त्याचा स्फोट होऊ शकतो किंवा आग लागू शकते. स्मार्टफोन कधीही उशीवर जिथे हवा पोहोचत नाही अशा ठिकाणी ठेवू नका. स्मार्टफोनला लागलेल्या आगीमुळे गेल्या वर्षभरात काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे.


 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : वाढदिवसाला मनासारखे गिफ्ट का दिले नाही? भांडणात पत्नीच्या ठोश्यात पतीचा मृत्यू