Samsung Galaxy A Series: सॅमसंगच्या Samsung Galaxy A54 आणि Samsung Galaxy A34 बद्दल सध्या खूप चर्चा होत आहे. मात्र अद्याप हे फोन लॉन्च झालेले नाहीत. याशीच संबंधित एक बातमी समोर आली आहे. Samsung Galaxy A54 आणि Galaxy A34 15 मार्च रोजी ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. परंतु या दोन्ही स्मार्टफोन्ससाठी कोणता मोठा इव्हेंट केला जाईल की, केवळ प्रेस रिलीजद्वारे लॉन्च केला जाईल, याची पुष्टी झालेली नाही. लीक झालेल्या माहितीनुसार, हे फोन AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो.


Samsung Galaxy A54 स्पेसिफिकेशन 



  • डिस्प्ले: 6.4-इंच सॅमोलेड FHD+ डिस्प्ले

  • चिप: Exynos 1380 SoC

  • RAM आणि स्टोरेज: 8GB RAM आणि 256GB स्टोरेज


Samsung Galaxy A54 ला 2340 x 1080p पिक्सेल रिझोल्यूशन, पंच-होल कटआउट आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. फोनला 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy A54 ला f/1.18 अपर्चर आणि OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी सेन्सर, f/2.2 अपर्चरसह 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 5MP मॅक्रो लेन्स मिळू शकतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. Samsung Galaxy A54 मध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, NFC, OTG आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळू शकतात.


Samsung Galaxy A34 स्पेसिफिकेशन 



  • डिस्प्ले: 6.6-इंच फुल HD+ सॅमोलेड डिस्प्ले

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 1080 SoC

  • RAM आणि स्टोरेज: 8GB RAM आणि 256GB स्टोरेज

  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 13 OS


Samsung Galaxy A34 5G ला 2340 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि सेल्फी स्नॅपरसाठी पंच-होल कटआउट मिळण्याची अपेक्षा आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, Samsung Galaxy A34 ला मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 48MP प्रायमरी सेन्सर, f/2.2 अपर्चरसह 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि f/2.4 अपर्चरसह 5MP मॅक्रो लेन्स आहेत. सेल्फीसाठी फोनच्या पुढील भागात 13MP कॅमेरा मिळू शकतो. 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आढळू शकते.


Lava Agni 2 देखील लवकरच होणार लॉन्च 


गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये MediaTek Dimensity 1080 chipset सह अनेक स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. यामध्ये Realme, Redmi आणि Infinix फोनचा समाविष्ट होता. आता लीक्स येत आहेत की, भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावा आपला नवीन फोन या चिपसह लॉन्च करू शकतो. लावाचा आगामी स्मार्टफोन Lava Agni 2 एका वेबसाइटवर स्पॉट झाला आहे, ज्यावरून ही माहिती समोर आली आहे.