Samsung Galaxy A16 5G : सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतात गॅलॅक्‍सी ए16 5जी च्‍या लाँचची घोषणा केली. युजर्सना अगदी किफायतशीर दरामध्‍ये सर्वोत्तम नाविन्‍यता देत गॅलॅक्‍सीने भारतातील मिड-रेंज स्‍मार्टफोन्‍स उपलब्ध केलेत. हा स्मार्टफोन्स 6 जनरेशन्‍स आणि 6 वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत. 


सॅमसंग गॅलॅक्‍सी ए16 हा 5जी फोन असून 8जीबी/128 जीबी आणि 8जीबी/256 जीबी अशा दोन्ही  व्‍हेरिएण्‍ट्ससह गोल्‍ड, लाइट ग्रीन आणि ब्‍ल्‍यू ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.हा स्‍मार्टफोन आजपासून रिटेल स्‍टोअर्स, Samsung.com आणि ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍ससह Amazon.in व Flipkart.com वर उपलब्‍ध असेल. टिकाऊपणाला पूरक सॅमसंगची नॉक्‍स वॉल्‍ट चिपसेट आहे. जी पिन, पासवर्डस् व पॅटर्न्‍स अशा संवदेनशील डेटाचे संरक्षण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी सॉफ्टवेअर व हार्डवेअर धोक्‍यांपासून संरक्षणासाठी स्‍वतंत्र टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट स्‍टोरेजसह येते. 


किंमत किती आणि वैशिष्ट्ये काय?


सॅमसंग गॅलॅक्‍सी ए16 हा फोन 18999 या किंमतींपासून सुरु होत आहे. सॅमसंग गॅलॅक्‍सी ए16 5जी स्लीक असण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसची जाडी फक्‍त 7.9 मिमी आहे. ज्‍यामुळे आतापर्यंतचा सर्वात सडपातळ मिड-रेंज गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन आहे.आयकॉनिक 'की आयलँड' आकर्षकता, तसेच सुधारित ग्‍लास्टिक बॅक व सडपातळ बेझल्‍ससह हा स्‍मार्टफोन व्हिज्‍युअली आकर्षक दिसतो. या डिवाईसमध्‍ये भारतीय वापरकर्त्‍यांना लक्षात घेऊन विकसित करण्‍यात आलेले वैशिष्‍ट्य वॉईस फोकस आहे. ज्‍यामधून गोंधळयुक्‍त वातावरणामध्‍ये देखील सुस्‍पष्‍ट संवादाची खात्री मिळते. 


 गॅलॅक्‍सी ए16 5जी मध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. अपग्रेडेड मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर असलेला हा स्‍मार्टफोन हायपर-फास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि विनासायास मल्‍टीटास्किंग देतो. या डिवाईसमध्‍ये ट्रिपल कॅमेरा सिस्‍टम आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्‍सल वाइड, 5 मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड आणि 5मेगापिक्‍सल मॅक्रो लेन्‍स आहे.  अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स विशेषत: नयनरम्‍य लँडस्‍केपेस् आणि व्‍यापक शॉट्स कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रत्‍येक फ्रेममध्‍ये आकर्षक फोटो कॅप्‍चर करत त्‍यांची सर्जनशीलता दाखवता येते.  याला पूरक अशा वैविध्‍यपूर्ण सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह मोठी 6.7 इंच फुल एचडी+ स्क्रिन आहे.                                  


ही बातमी वाचा : 


मोठी बातमी! देशातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या IT कंपनीला 6506 कोटींचा नफा, गुंतवणूकदारांना मोठा लाभांश जाहीर