Robotic Chef Made Meal : जगभरात तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, लोक तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाहीत. माणसांची रोजची कामे कमी करण्यासाठी अनेक संशोधक काही ना काही चमत्कार करण्याच्या प्रयत्नात आहेत. असेच संशोधकांनी तयार केलेला रोबोटिक शेफ स्वयंपाकाचे व्हिडीओ (Video) पाहून अगदी माणसाप्रमाणे रुचकर जेवण बनवू शकतो. केंब्रिज (Cambridge) विद्यापीठाच्या संशोधकांनी या रोबोटिक शेफला आठ विविध सॅलेडच्या रेसेपी आतापर्यंत शिकवल्या आहेत. सुरुवातीला या रोबोटिक शेफला (Robotick Chef) काही रेसिपीजचे व्हिडीओ दाखवण्यात आले. त्या रेसिपींप्रमाणे तंतोतंत सॅलेड या शेफने बनवले. सॅलेड बनवण्याची संपूर्ण रेसिपी लक्षात ठेवून रोबोटने अगदी सहजरित्या हे बनवले. 


जर्नल IEEE च्या अभ्यासानुसार व्हिडीओ हे कोणत्याही रोबोटला शिकवण्यासाठीचे एक उपयुक्त साधन आहे. व्हिडीओद्वारे हे रोबोट लवकरात लवकर शिकू शकतात. रोबोटिक शेफची संकल्पना ही विज्ञानात खूप सुरुवातीच्या काळापासून आहे. माणसांप्रमाणे स्वयंपाक बनवणे हे रोबोटकरता कठीण गोष्ट आहे. मात्र तरीही काही कंपन्यांनी अशा पद्धतीचे रोबोट बनवले आहेत जे अजून मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेले नाहीत. 


रोबोटला स्वयंपाक बनवण्यासाठी प्रशिक्षण


केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांनी तयार केलेल्या रोबोटला मानवांप्रमाणे स्वयंपाक बनवण्यासाठी ट्रेनिंग दिले आहे. यासाठी त्यांनी स्वत: सॅलेडच्या आठ रेसिपी शूट केल्या. या शूट केलेल्या रेसिपी रोबोटला शिकवण्यासाठी त्यांनी सार्वजनिकरित्या उपलब्ध असणाऱ्या न्यूरल नेटवर्कचे (Neural Network) वापर केला. हा रोबोट रेसिपीसाठी लागणारी सर्व सामग्री अगदी सहजरित्या ओळखतो. सगळी सामग्री लक्षात ठेवून तो संपूर्ण रेसिपी काही आवश्यक बदलांसह नव्याने रुचकर जेवण बनवू शकतो. सॅलेडच्या रेसिपीमध्ये वापरली जाणारे फळे, भाज्या विविध वस्तू ओळखण्यासाठी आधीच प्रोग्रॅम (Programme) केलेले होते. काॅम्पुटर व्हिजन (Computer Vision) तंत्राचा वापर करुन रोबोटने रेसिपीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी फ्रेमद्वारे लक्षात घेतल्या.


भविष्यात रोबो शेफचा वापर घरात, हॉटेलध्ये करता येऊ शकतो 


संशोधकांनी बनवलेल्या या रोबोटने 16 व्हिडीओंपैकी 93 टक्के रेसिपी या अचूक ओळखल्या. अनेक सोशल मीडियाच्या सहाय्याने हा रोबोट बऱ्याच नवनवीन गोष्टी सहज शिकू शकतो. भविष्यात हे संशोधन खूप प्रगती करु शकते. अशा रोबो शेफचा वापर घरात, हाॅटेलमध्ये करता येऊ शकतो. भविष्यात येणाऱ्या अनेक नवख्या तंत्रज्ञानांपैकी रोबोटिक शेफ हे एक नवीन संशोधन ठरु शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Kolhapur News: कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात; हिंसक जमावाला पांगवताना पोलिस यंत्रणेची पुरती दमछाक; लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या