रिलायन्स जिओ लवकरच 3G स्मार्टफोनवरही चालणार?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच या नव्या ऑफरची घोषणा केली होती.
जिओ 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरअंतर्गत युझर्सना 31 मार्च 2017 पर्यंत मोफत डेटा वापरता येणार आहे.
सध्या रिलायन्स डेटासाठी 4G LTE डिव्हाईस आणि व्हॉईस कॉलिंगसाठी VoLTE डिव्हाईस सपोर्टीव्ह आहे. त्यामुळे अॅपच्या माध्यमातून 3G युझर्सना या सेवेचा कसा लाभ मिळतो, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे अॅप या महिन्याच्या अखेरपर्यंत लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. जेणे करुन हॅप्पी न्यू ईयर ऑफरचा फायदा 3G ग्राहकांनाही घेता येईल.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार जिओकडून सध्या एक असं अॅप बनवलं जात आहे, ज्यावर 3G युझर्सनाही 4G इंटरनेटचा लाभ घेता येईल.
त्यामुळे रिलायन्स जिओ लवकरच आता 3G स्मार्टफोन युझर्सनाही वापरता येणार असल्याची माहिती आहे.
मात्र भारतात सध्या 3G स्मार्टफोन युझर्सची संख्या जास्त आहे. विशेषतः ग्रामीण भागात अनेक ठिकाणी 4G सेवा उपलब्ध नाही.
रिलायन्स जिओने 4G ग्राहकांना मोफत इंटरनेट सेवा देऊन मोठं गिफ्ट दिलं आहे. जिओची सेवा सध्या फक्त 4 G स्मार्टफोन असेल तरच वापरता येते.