Fridge Tips : सध्याच्या काळात रेफ्रिजरेटर (Refrigerator) ही आवश्यक गोष्ट झाली आहे. बर्फ, थंड पाणीच नव्हे तर खाद्यपदार्थ दीर्घकाळ ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर वाढू लागला आहे. फ्रीजशिवाय कच्चे आणि शिजवलेली भाजी, फळे हे अधिक दिवस ठेवणे याची कल्पनाच कोणी करू शकत नाही. मात्र, फार कमी लोकांना फ्रीज नेमका कोणत्या ठिकाणी असावा याची योग्य माहिती नसते. त्यामुळे अनेकांचा फ्रीज फार लवकर खराब होतो.
रेफ्रिजरेटर नेहमी आतून थंड असतो, बरेचदा लोक त्यात जास्त गरम वस्तू ठेवतात, ज्यामुळे तो खराब होण्याची शक्यता वाढते. त्याच वेळी, स्वयंपाकघरातील तापमान देखील जास्त असते, ज्यामुळे रेफ्रिजरेटर खराब होऊ शकते.
रेफ्रिजरेटर कोणत्या दिशेला ठेवल्याने त्याचे आयुष्य वाढते?
जर तुम्ही फ्रीजला योग्य दिशेने ठेवले तर फ्रीजचे अधिक काळापर्यंत काम करू शकते आणि दीर्घकाळापर्यंत कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. रेफ्रिजरेटर ठेवण्यासाठी अनेक जागा योग्य आहेत. जेणेकरून त्यांचे आयुर्मान वाढू शकते. मात्र, तुम्ही काही योग्य निवडक जागांचा विचार करू शकता.
कोणती दिशा योग्य आहे?
तुम्ही फ्रीज ठेवण्यासाठी योग्य जागा शोधत असाल जिथे तो वर्षानुवर्षे उत्तम प्रकारे काम करेल, तर तुम्ही तो बाल्कनी असलेल्या खोलीत ठेवू शकता. या खोलीत भरपूर वायुवीजन (व्हेंटिलेशन) आहे आणि तुमच्या फ्रीजमधून निघणारी उष्णता सहज बाहेर जाते आणि तुमच्या घरात राहत नाही. जर तुम्हाला तुमचा फ्रीज बराच काळ चांगल्या स्थितीत ठेवायचा असेल, तर वायुवीजन खूप महत्वाचे आहे आणि यासाठी बाल्कनी असलेली खोली चांगली जागा ठरू शकते.
खिडकी असणारी खोली : जर तुम्ही फ्रीज खिडकी नसलेल्या खोलीत ठेवला असेल तर त्याची जागा तातडीने बदलावी. खिडकी असलेली खोली तुम्हाला बऱ्यापैकी, चांगल्याप्रकारे वायुवीजन देते. त्यामुळे फ्रीजमधून बाहेर पडणारी उष्णता सहजपणे खोलीच्या बाहेर निघून जाते.
जर, तुम्ही खिडकी नसलेल्या ठिकाणी फ्रीज ठेवत असाल आणि त्या ठिकाणी वायुवीजन नाही तर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा तुम्हाला त्रास होईलच शिवाय फ्रीजही लवकर खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे हवा खेळती असणाऱ्या ठिकाणी, त्या बाजूच्या दिशेला फ्रीज ठेवावा.