Redmi Note 13 Series : भारतात 4 जानेवारीला शाओमीचे (Redmi) अनेक फोन नवीन वर्षात लाँच होणार आहेत. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी 2024 च्या सुरुवातीला रेडमी नोट 13 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. Redmi Note 13 5G, Note 13 Pro, Note 13 Pro Plus  हे तीन 5G कनेक्टिव्हिटी फोन भारतीय बाजारात एकाच वेळी लाँच केले जाणार आहेत. या प्रत्येक फोनमध्ये कर्व्ह्ड स्क्रीन, IP68 रेटिंगसह सर्व 'प्रो प्लस' फीचर्स मिळतील. 'NOTE' कमी किमतीत दमदार स्पेसिफिकेशन्सने फोनसाठी ओळखली जाते. अशापरिस्थितीत शाओमीच्या आगामी Note 13  सीरिजच्या फोनमध्येही दमदार स्पेसिफिकेशन्स दिसतील, अशी अपेक्षा आहे.


Redmi Note 13 सीरिजच्या प्रत्येक फोनमध्ये खास चिपसेट आणि फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. किंमतीच्या आधारावरही ते एकमेकांपेक्षा वेगळे असतील. चिनी बाजारात उपलब्ध असलेल्या Redmi Note 13 सीरिजसारखे फिचर्स भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या फोनमध्ये असण्याची शक्यता आहे. लाँचिंगपूर्वीच शाओमी इंडियाकडून अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. 


रेडमी नोट 13 प्रो प्लस  फीचर्स 



रेडमी नोट 13 प्रो प्लसमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा 1.5 के ओएलईडी डिस्प्ले आहे. स्क्रीन ब्राइटनेस जास्तीत जास्त 1,800 निट्सपर्यंत वाढवता किंवा कमी केली जाऊ शकते. कर्व्ह्ड पॅन डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे.


रेडमी नोट 13 प्रो प्लस मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 अल्ट्रा चिपसेट असेल. यात 16 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असणार आहे. चार्ज करण्यासाठी 120 वॉट फास्ट चार्जिंग (वायर्ड) सपोर्ट मिळेल.


फोटोग्राफीच्या दृष्टीने रेडमी नोट 13 प्रो प्लस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये तंत्रज्ञानावर आधारित 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.


रेडमी नोट 13 प्रोमध्ये मिळणार हे फीचर्स


रेडमी नोट 13 प्रो आगामी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट मिळेल. यात 5100 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात चार्ज करण्यासाठी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. फोनमध्ये IP68 रेटिंग फीचर मिळणार नाही. फोनची स्क्रीन फ्लॅट असेल.


रेडमी नोट 13 चे स्पेसिफिकेशन्स उपलब्ध 


रेडमी नोट 13 फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले साइज आहे. अमोलेड डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 पी, रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. 1000 निट्स वजा करून स्क्रीनची ब्राइटनेस वाढवता येते. त्याच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ आहे. रेडमी नोट 13 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसर आहे. यात 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 13 मध्ये 100 मेगापिक्सलप्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात चार्ज करण्यासाठी 33 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी याला केवळ IP54  रेटिंग आहे.चिनी बाजारात उपलब्ध रेडमी नोट 13 सीरिजचे सर्व फोन अँड्रॉइड 13-आधारित  MIUI 1414 सॉफ्टवेअरवर काम करतात. भारतात येणारे हँडसेटही याच सॉफ्टवेअरवर चालतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


LG AI Robot : फिरायला गेल्यावर घराची चिंता विसरा; LG ने तयार केला एआय होम असिस्टंट रोबोट; घरातील पाळीव प्राण्यावरही ठेवणार लक्ष!