Realme Smartphone : Realme स्मार्टफोन (Smartphone) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. रिअलमी (Realme) कंपनी 2 एप्रिल रोजी भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचं नाव Realme 12x 5G असणार आहे. या स्मार्टफोनच्या संदर्भात बाजारात अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोन लॉन्च होण्याच्या काही दिवसांआधीच त्याची किंमतसुद्धा लीक झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये नेमको कोणते फीचर्स असतील ते जाणून घेऊयात.

  


Realme 'हा' स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार 


Realme कंपनीकडून Realme 12x 5G हा स्मार्टफोन येत्या 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. कंपनीने या फोनचे एंट्री लेव्हल 5G फोन असे वर्णन केले आहे. फोनच्या संदर्भत कंपनीने खुलासा केला की, 12,000 रुपयांच्या आत येणारा 45W फास्ट चार्जिंग आणि 5G कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध असणारा हा स्मार्टफोन भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. 






कंपनीने या फोनचा टीझर देखील जारी केला आहे. टीझरवरून हा स्मार्टफोन दोन कलरमध्ये लॉन्च होणार आहे असं दिसतंय. फोनच्या मागील बाजूस मध्यभागी एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. या फोनचे अनेक फीचर्स आधीच लीक झाले होते, मात्र आता  या फोनची किंमतही लीक झाली आहे. 


फीचर्सनंतर किंमतही लीक झाली...


टिपस्टरने दिलेल्या महितीनुसार, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणार आहे. तर, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 15 हजारांहून कमी किंमतीत असण्याची शक्यता आहे. 


तसेच, जर आपण या फोनच्या लीक वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर, या फोनमध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.72 इंच एलसीडी स्क्रीन दिली जाऊ शकते, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz असेल. या फोनची पीक ब्राइटनेस 950 nits असण्याची अपेक्षा आहे, तर प्रोसेसरसाठी, MediaTek Dimensity 6100+ चिपसेट वापरला जाऊ शकतो.


या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP मुख्य कॅमेरा सेटअप, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट, Android 14 वर आधारित OS चा सपोर्ट, साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यासह अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :


Apple WWDC Event 2024 : Apple चा सर्वात मोठा इव्हेंट 'या' तारखेला होणार; Apple iOS 18, iPadOS 18सह अनेक गोष्टी असतील खास