Realme GT Neo 5 SE: चीनी स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच मोबाईल वर्ल्ड इव्हेंटमध्ये आपला Realme GT New 5 स्मार्टफोन लॉन्च केला. हा तोच स्मार्टफोन आहे ज्यामध्ये कंपनीने 240W फास्ट चार्जर दिला आहे. अशातच एक बातमी व्हायरल होत आहे. ज्यात सांगण्यात येत आहे की, कंपनी आता Realme GT Neo 5 SE लॉन्च करण्याच्या तयारीत आहे आणि यात 5500 mAh बॅटरी मिळू शकते. लॉन्चपूर्वी एका प्रसिद्ध टिपस्टरने ट्विटर अकाऊंटद्वारे मोबाईल फोनचे फीचर्स लीक केले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
संभावित स्पेसिफिकेशन
Realme GT Neo 5 SE मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. जो 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जनरेशन 1 प्रोसेसरसह येऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मायक्रोलेन्स असेल. कंपनी समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा देऊ शकते.
Realme GT New 5 SE मध्ये 5500 mAh बॅटरी मिळू शकते, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Realme ने Realme GT New 5 मध्ये 240W फास्ट चार्जर दिला आहे, जो फोन फक्त 10 मिनिटांत 100% चार्ज करतो. Realme नंतर, Xiaomi ने मोबाईल वर्ल्ड इव्हेंटमध्ये 300W फास्ट चार्जर सादर केला. हा चार्जर अवघ्या 5 मिनिटांत मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करतो.
Xiaomi 13 Pro ची विक्री सुरू
Xiaomi च्या नवीन फोन Xiaomi 13 Pro ची आजपासून विक्री सुरुवात झाली आहे. MI च्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता. Xiaomi 13 Pro च्या 12GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे, परंतु ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही 20,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
Vivo ने लॉन्च केले रंग बदलणारे 2 दमदार स्मार्टफोन
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपली Vivo V27 सीरीज भारतात लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने 2 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यात Vivo V27 आणि Vivo V27 Pro चा समावेश आहेत. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 66 वॉट फास्ट चार्जिंगसह 4600 mAh बॅटरी मिळेल. MediaTek Dimensity 7200 आणि 8200 प्रोसेसर असलेले मोबाईल फोन लॉन्च करण्यात आले आहेत. Vivo V27 कंपनीने दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. याच्या 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे. Vivo V27 Pro ला 6.7-इंचाचा हाय रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाईल फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरवर काम करेल.