Ray-Ban Meta Smart Glasses : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI च्या या काळात (Ray-Ban Meta Smart Glasses )सर्व काही शक्य आहे. डोळ्यात घातलेला गॉगल कधी पाहू शकतो आणि बोलू शकतो, असा विचारही तुम्ही केला नसेल. पण मेटाने हे सत्य सिद्ध केले असून कंपनीने रे-बॅनसोबत मिळून स्मार्ट गॉगल तयार केला आहे. या स्मार्ट गॉगलची सध्या चाचणी सुरू असून सध्या ती चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या स्मार्ट गॉगलचा एक व्हिडिओ मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कसा असेल हा गॉगल?, कोणते फीचर्स असतील पाहुया...


अॅपशी जोडला जाईल गॉगल 



मेटाचा हा स्मार्ट रे-बॅन गॉगल AI  तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करतो. त्यात कॅमेरा आणि मायक्रोफोन आहे. जो आजूबाजूच्या गोष्टी पाहू आणि ऐकू शकतो. गोष्टी अॅनालाइज केल्यानंतर गॉगल आपल्याला माहिती पुरवतो. हे स्मार्ट गॉगल एका अॅपशी कनेक्ट होणार आहे. ज्यात तुम्हाला सर्व माहिती मिळेल. 


Ray-Ban Meta Smart Glasses गॉगल कसा काम करेल?


मार्क झुकेरबर्गने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा तो गॉगल  घालतो आणि समोरच्या शर्टसोबत कोणता रंग योग्य असेल असे विचारतो, त्याला उत्तर देताना गॉगल आधी शर्ट अॅनालाईज करतो आणि नंतर शर्टसोबत कोणता पँट चांगला असेल हे सांगतो.  याशिवाय अॅपच्या माध्यमातून गॉगल ऑपरेट करून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती गोळा करू शकता. 


उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या लँडमार्कबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अॅपवरून कमांड देऊ शकता आणि लँडमार्कची माहिती मिळवू शकता. असे असेल की गॉगलला लँडमार्क दिसेल आणि त्यानंतर आपल्याला अॅपमध्ये सर्व माहिती मिळेल. त्यासोबतच फोटोत दिसणाऱ्या कोणत्याही भाषेला तुम्ही ट्रान्सलेट करु शकणार आहात. बघण्याचं आणि ऐकायचं काम गॉगल करणार आहे आणि त्याच्या अॅपमध्ये आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. 


फिचर्स काय आहेत?


 रे-बॅन मेटा स्मार्ट गॉगल नवीन Qualcomm Snapdragon  AR1 Gen1 प्लॅटफॉर्मद्वारे तयार करण्यात आला आहे. ज्यात फोटो आणि व्हिडीओ क्वालिची चांगली आहे. प्रोसेसिंगदेखील फास्ट आहे. एकदा चार्ज केल्यावर 36 तास वापरु शकणार आहात. चांगला कॅमेरा आणि विविध फिचर्स असलेला हा गॉगल सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 






इतर महत्वाची बातमी-


Instagram Blue Tick : फॉलोवर्स जास्त नाहीयेत, तरीही इन्स्टाग्रामवर ब्लू टीक हवीये? 'या' स्टेप्स करा फॉलो!