Poco X6 Pro Launched Date : गेल्या वर्षी चिनी ब्रँड (Chinese Smartphone Brand) शाओमीने (Xiaomi) त्यांचा स्वतःच्या ऑपरेटिंग सिस्टीम HyperOS ला लाँच केलं होतं. परंतु हे भारतात आता तरी आलेलं नाही. पोको कंपनी 11 जानेवारीला Poco X6  सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये Poco X6 आणि Poco X6 Pro हे  स्मार्टफोन असणार आहेत. प्रो व्हर्जनमध्ये तुम्हाला HyperOS बघायला मिळू शकतो. रेडमीने (Redmi) सुद्धा एक नवीन सिरीज लॉंच केली आहे ज्याच्यामध्ये HypherOS मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


HypherOS चे फिचर्स 


शाओमीच्या या  HypherOS ला कंपनीने विशेष पद्धतीने डिझाईन केलं आहे. या कारणाने मोबाईल फोनचा परफॉर्मन्स फास्ट होऊ शकतो. ही ऑपरेटिंग सिस्टिम शाओमीच्या Vela सिस्टीमसारखे काम करते. तसेच, चॅलेंजिंग स्थितीत या स्मार्टफोनला फास्ट काम करण्यासाठी मदत करते. याव्यतिरिक्त यामध्ये AI इंटीग्रेशन, क्रॉस डिवाइस कनेक्टिविटी, प्रायव्हसी अँड सेक्युरिटी, असे अनेक फिचर्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही फोटोला टेक्स्टमधून एक्सट्रेक्ट, डूडलला इमेजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठीदेखील काम करते. 


Poco X6 Pro ची स्पेसिफिकेशन


या फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंच 1.5k LTPS स्क्रीन 120hz चा रिफ्रेश रेट यासोबतच MediaTek Dimensity 8300 Ultra processor, 64+8+2 MP चे तीन कॅमेरा, आणि 67 वॉटची फार चार्जिंग यात मिळणार आहे. स्मार्टफोनची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या आसपास असू शकते. पण ही किंमत काही लिक्सवरून आधारित आहे. स्टोरेज व्हेरिएंटच्या हिशोबाने ती कमी जास्त होऊ शकते. 


गॅलेक्सी S24 सिरीज लाँच


पोकोनंतर सॅमसंग (Samsung) आपली गॅलेक्सी S24 (Galaxy S24) ही सिरीज लाँच करणार आहे. यात तीन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. सध्या या सिरीजसाठी प्री-बुकिंग सुरू झालेली आहे. जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस 24 सीरिजचे प्री-बुकिंग केले तर, कंपनी तुम्हाला 5,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा देईल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू आणि स्पेशल एडिशन फोन आणि सॅमसंग क्लब मेंबर होण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये कंपनी वेलकम वॉचर कंपनीला 5,000 रुपयांपर्यंत देऊ शकते. मोबाइल फोनचे प्री-बुकिंग करण्यासाठी आता 1,999 रुपये मोजावे लागतील, जे रिफंडेबल आहे. डिव्हाइस बुक करण्यासाठी तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.


महत्वाच्या इतर बातम्या :


TECNO POP 8 launched in India : अवघ्या 5999 रुपयांत लाँच झाला बेस्ट 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन, मिळणार 8 GB RAM आणि 5000 mAhबॅटरी!