Poco X5 Pro 5G: चीनी मोबाईल फोन निर्माता पोको (Poco) उद्या भारतात आपला नवीन स्मार्टफोन Poco X5 Pro 5G लॉन्च  करणार आहे. कंपनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा स्मार्टफोन बाजारात सादर करणार आहे. दरम्यान, मोबाईल लॉन्च होण्याआधीच याची किंमत समोर आली आहे.  Poco X5 Pro 5G ची किंमत YouTube जाहिरातीद्वारे लीक झाली आहे.


Poco X5 Pro 5G: किती असू शकते किंमत? 


टिपस्टर अभिषेक यादवने याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे एक ट्वीट करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, भारतात Poco X5 Pro 5G ची किंमत 22,999 रुपये असेल. यामध्ये ग्राहकांना ICICI बँक कार्डवर 2,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल, त्यानंतर याची किंमत 20,999 रुपये असेल. त्याने ट्विटमध्ये एका यूट्यूब जाहिरातीचा फोटोही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पोकोच्या स्मार्टफोनची किंमत सांगितली आहे.


Poco X5 Pro 5G: स्पेसिफिकेशन 


या पोको (Poco) स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G 5G प्रोसेसरवर काम करेल. यामध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल. जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कॅमेऱ्याच्या बाबतीत, तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप पहायला मिळेल. ज्यामध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा असेल. समोरील बाजूस सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.






पोकोने आपल्या ट्विटर हँडलद्वारे सांगितले की, ग्राहक फ्लिपकार्टद्वारे पोकोचा हा इव्हेंट पाहू शकतात. तुमच्या सोयीसाठी, आम्ही येथे लिंक देखील देत आहोत: https://www.flipkart.com/poco-x5-pro-5g-livcomm-store 


वनप्लस नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार 


पोकोचा (Poco ) स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 फेब्रुवारीला वनप्लस (OnePlus) आपले अनेक गॅजेट्स बाजारात सादर करेल. 7 फेब्रुवारी रोजी OnePlus आपले दोन नवीन स्मार्टफोन OnePlus 11 5G आणि OnePlus 11 R लॉन्च करेल. OnePlus 11 5G मध्ये ग्राहकांना Qualcomm Snapdragon 8 gen 2 soc चा सपोर्ट मिळेल. 


हेही वाचा: 


Chinese Internet of Things : चीनचं नवं शस्त्र जगासाठी धोक्याची घंटा; इंटरनेट नेटवर्कचा हेरगिरीसाठी वापर, समोर आली 'ही' धक्कादायक माहिती