Poco X5 5G Vs Moto G73 5G: Poco X5 5G आता भारतात लॉन्च झाला आहे. मिड-रेंजमध्ये लॉन्च केलेला हा पोको स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. Poco X5 5G ची थेट स्पर्धा Motorola च्या नुकत्याच लॉन्च झालेल्या 5G स्मार्टफोनशी आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनीने नुकताच Moto G73 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करत नाही, तर मीडियाटेक चिपसेटवर काम करतो. दोन्ही 5G स्मार्टफोनची किंमत जवळपास सारखीच आहे. जर तुम्ही बजेट रेंजमध्ये स्मार्टफोन खरेदी करणार असाल आणि Poco आणि Motorola यांच्यात गोंधळ होत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी या दोन्ही स्मार्टफोनची तुलना करून कोणता बेस्ट आहे, हे सांगणार आहोत...


Poco X5 5G vs Moto G73 5G: डिस्प्ले


Poco X5 मोठ्या डिस्प्लेसह येतो. Poco X5 5G मध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले 120Hz रीफ्रेश रेट आणि 1200 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिला ग्लास 3 चे कोटिंग मिळाले आहे आणि ते स्क्रॅच-रेजिस्टंट बनले आहे. दुसरीकडे Moto G73 5G मध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे.


Poco X5 5G Vs Moto G73 5G: प्रोसेसर


Poco X5 मध्ये उत्तम प्रोसेसर देण्यात आला आहे. Poco X5 5G ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर काम करते, तर Moto G73 5G ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 930 चिपसेटद्वारे समर्थित आहे.


Poco X5 5G Vs Moto G73 5G: ऑपरेटिंग सिस्टम


Moto G73 5G नवीन Android 13 OS वर चालतो, तर Poco X5 5G Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात मोटो वरचढ ठरतो.


Poco X5 5G Vs Moto G73 5G: रॅम आणि स्टोरेज


Poco X5 5G दोन प्रकारांमध्ये 6GB+128GB आणि 8GB+256GB सादर करण्यात आला आहे. युजर्स मायक्रोएसडी कार्ड जोडून स्टोरेज वाढवू शकतात. दुसरीकडे Moto G73 5G फक्त एकाच प्रकारात 8GB+128GB लॉन्च करण्यात आला आहे. यात मायक्रोएसडी कार्डचाही सपोर्ट आहे.


Poco X5 5G Vs Moto G73 5G: कॅमेरा


Poco स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48MP मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. समोर 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे Moto G73 5G ड्युअल रीअर कॅमेऱ्यांसह येतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे.


Poco X5 5G Vs Moto G73 5G: बॅटरी


Poco X5 5G आणि Moto G73 5G या दोन्हींमध्ये 5000 mAh बॅटरी आहे. Poco X5 5G 33W फास्ट चार्जिंगसह येतो. तर Moto G73 5G 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.