Google New Update : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळं (Artifical Intelligence) तंत्रज्ञान (Technology) युगात मोठे बदल घडत आहेत. यामुळे सर्व कंपन्यांकडून या स्पर्धेत टिकण्यासाठी नवनवीन शोध लावले जात आहेत. अलिकडेच ChatGPT आणि बिंग यांना एकत्र आणत मायक्रोसॉफ्टनं तंत्रज्ञान जगतात मोठा बदल केला. आता गुगलही चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी पूर्ण तयारीनिशी बाजारात उतरला आहे. गुगलने वर्कस्पेस ॲप्ससाठी AI फीचर्स जाहीर केले आहेत. म्हणजेच, युजर्संना जीमेल, डॉक्स आणि इतर ॲप्सवर AI फिचर्स वापरता येतील.


AI लिहिणार तुमचा मेसेज


तुम्हाला जर आता Gmail वर राजीनामा किंवा इतर काही लिहायचं असेल तर, गुगलचं नवं AI Power Tool तुमचं हे काम चुटकी सरशी करणार आहे. तुम्ही गुगल ॲप्समध्ये एखादा विषय (Topic) टाईप केला तर गुगलचं नवीन फीचर AI Power Tool टूल तुम्हाला मजकूर लिहून देईल. तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. AI Power Tool तुम्ही टाईप केलेल्या विषयासंबंधित मजकूर उपलब्ध करुन देईल, त्यामुळे तुम्हाला गुगल ॲप्समध्ये स्वत: लिहायची गरज पडणार नाही, गुगलचं नवीन AI टूल तुमच्यासाठी हे काम करेल.


गुगलकडून नवीन अपडेट जारी 


गुगलने (Google) चॅटजीपीटी (ChatGPT) चॅटबॉटला टक्कर देण्यासाठी Bard चॅटबॉट लाँच केला आहे. आता गुगलने ॲप्ससोबत AI फीचर जोडलं आहे. यामुळे युजर्सना Google Docs, Gmail, Sheets आणि Slides सारख्या ॲप्समध्ये AI पॉवर्ड फीचर्स मिळतील. गुगलने ब्लॉग लिहून याबाबतची माहिती दिली आहे. 


AI मुळे तंत्रज्ञान क्षेत्रात स्पर्धा


गुगल कंपनीने सांगितले की, जवळपास 25 वर्षांपासून गुगल लोकांना मदत करण्यासाठी विविध उत्पादनं तयार करत आहे. गुगलने सर्चपासून ते मॅपपर्यंत विविध प्रकारच्या सेवा सुरु केल्या आहेत. अलीकडेच AI ने स्पर्धा वाढवून सर्वच क्षेत्रांमध्ये नवीन गती आणली आहे. 


Google AI फीचर कधी लाँच होणार?


Google ने म्हटले आहे की, "आम्ही वर्कस्पेस युजर्सना AI च्या माध्यमातूल सुपरपॉवर देत आहोत. याचा वापर करुन युजर्स अधिक चांगल्या प्रकारे संपर्क करु शकतील. दरम्यान AI फीचर्स सध्या सर्व युजर्ससाठी नसून केवळ निवडक युजर्ससाठी लाँच करण्यात येईल. कंपनी येत्या काही दिवसांत निवडक युजर्संना टेस्टिंगसाठी हे फीचर सुरु करेल. त्यानंतर कंपनी या फीचर्समध्ये योग्य सुधारणा करुन सर्व युजर्ससाठी हे फीचर्स लाँच करेल.


AI Power Tool कसं काम करेल?


तुम्ही Gmail किंवा Google Docs वापरत आहात आणि तुम्हाला एखाद्या विषयावर लिहायचं असेल तर युजर्संना ज्या विषयावर लिहायचं आहे AI Power Tool मुळे त्या विषयाचा ड्राफ्ट तुम्हाला दिसू लागेल. यूजर्स हा ड्राफ्ट स्वतः एडिटही करु शकतील. यामुळे युजर्सचे काम सोपे होणार आहे, असं गुगलने सांगितलं आहे.


नवीन गुगल AI फिचर लाँच झाल्यानंतर, कामाच्या ठिकाणी युजर्संना Gmail मध्ये ड्राफ्ट, रिप्लाय करणं अधिक सोपं होईल. Docs मध्ये, युजर्संना प्रूफरीड, डॉक्युमेंट रिराईट यासाठी फीचर्स देण्यात येतील. याशिवाय यूजर्सना अनेक नवीन फीचर्स मिळतील.


What is AI-Artificial Intelligence : AI म्हणजे काय?


AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञान मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Career in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? AI क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी