मुंबई : स्टायलिश आणि इनोव्हेटिव्हस्मार्टफोनसाठी ओळखली जाणारी झेनोसीरिज आता आपला नवीन स्मार्टफोनझेनो 200 (ZENO 200) घेऊन आली आहे. हा स्मार्टफोन खास अमेझॉनवर उपलब्ध असेल. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणाऱ्या डिझाइनसह आलेला झेनो 200 स्टाईल आणि मजबुतीचे भन्नाट कॉम्बिनेशन देतो. या स्मार्टफोनमध्ये एमआयएल-एसटीडी-810 एच मिलिटरीग्रेडड्युरेबिलिटी देण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन सामान्य बजेटस्मार्टफोनपेक्षा अधिक मजबूत आहे. तसेच आयपी 65 रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासूनही फोन सुरक्षित राहतो.
झेनो 200 मध्ये आयटेलचा एआय असिस्टंट सोला देण्यात आला आहे, जो रोजच्या कामांना अधिक सोपे आणि जलद बनवतो. अल्ट्रालिंकफीचरमुळे नेटवर्क नसलेल्या भागातही कनेक्टिव्हिटी मिळते. हा स्मार्टफोन 4+8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. स्पेशल लॉन्चऑफरमध्ये याची किंमत फक्त 9999 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा स्मार्टफोनअमेझॉनवर उपलब्ध आहे.
आयटेल इंडियाचे सीईओ श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, “झेनोसीरिज म्हणजे फक्त स्मार्टफोन नाही, तर तो एक स्टाईलस्टेटमेंट आहे. ट्रेंडीलूकसोबत मजबूत बिल्ड हवी असणाऱ्या जेन झीयूजर्सना लक्षात घेऊन हा फोन तयार करण्यात आला आहे. आयपी 65 रेटिंग आणि मिलिटरीग्रेडप्रोटेक्शनमुळे हा फोन आणखी खास बनतो. अल्ट्रालिंक आणि आयआरब्लास्टरसारखेप्रीमियमफीचर्सही यात देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर मेमरीच्या किंमती वाढल्या असल्या तरी आम्ही हा फोनपरवडणाऱ्या किंमतीत आणला आहे.”
झेनो 200 मध्ये 6.75 इंचाचा 120 हर्ट्झ एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डीटीएस साउंड सपोर्टमुळेव्हिडिओ आणि म्युझिकचा अनुभव आणखी शानदार होतो. एआय असिस्टंट सोलामुळे समरी तयार करणे, डॉक्युमेंटमॅनेज करणे आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळवणे सोपे होते. रायटिंगअसिस्टंटद्वारेटेक्स्ट री-राइट करणे, स्पेलिंग आणि ग्रामरदुरुस्त करणे शक्य होते. एआय वॉलपेपरजनरेटरच्या मदतीने फोटो आणि टेक्स्टपासूनस्टायलिशवॉलपेपरही तयार करता येतात. डायनॅमिक बारमुळे बॅटरी, कॉल्स आणि नोटिफिकेशनअपडेट्स सहज पाहता येतात. कंपनीच्या मते हा फोन 4 वर्षांपर्यंत स्मूथपरफॉर्मन्स देईल. फोटोग्राफीसाठी 13 एमपी रियरकॅमेरा देण्यात आला आहे. तसेच आयआरब्लास्टरमुळेटीव्ही, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही कंट्रोल करता येतात.
ऑक्टा-कोर युनिसोक टी 7250 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 16 गोसह आलेला हा स्मार्टफोनगेमिंग, मल्टिटास्किंग आणि व्हिडिओकॉलिंगसाठी उत्तम अनुभव देतो. फेस अनलॉक आणि साईड फिंगरप्रिंटसेंसरची सुविधाही देण्यात आली आहे. 5000 एमएएचची मोठी बॅटरी आणि फास्टचार्जिंगसपोर्टमुळे हा फोन दिवसभर आरामात वापरता येतो. हा स्मार्टफोनकॉमेट ऑरेंज, मेटेओरटायटेनियम आणि नाइटली ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
