OnePlus Pad Launch : OnePlus ने आज आपला पहिला Android टॅब लॉन्च केला आहे. हा टॅब 11-इंचाच्या स्क्रीनसह येतो, जो 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या पॅडमध्ये तुम्हाला मागील बाजूस एक कॅमेरा मिळतो जो अगदी मध्यभागी ठेवला आहे. या पॅडबाबत कंपनीने दावा केला आहे की, तासनतास वापरल्यानंतरही लोकांना ते धरून ठेवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या टॅबमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन बद्दल ऐहिक माहिती जाणून घेऊ...


OnePlus Pad Launch : वनप्लस पॅड बॅटरी


OnePlus पॅडमध्ये 9,510 mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि ती 67 W SuperWook चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. पॅड 60 मिनिटांत 1 ते 90% पर्यंत चार्ज होऊ शकतो.


OnePlus Pad Launch : वनप्लस पॅड प्रोसेसर आणि डिस्प्ले


OnePlus Pad मध्ये MediaTek Dimensity 9000 SoC प्रोसेसर आणि 12GB RAM समर्थित आहे. OnePlus Pad मध्ये 11.61-इंच स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 144 Hz, 7: 5 आस्पेक्ट रेशो आणि 2800 x 2000 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.


OnePlus Pad Launch : वनप्लस पॅडचे फीचर्स 


वनप्लस पॅडमध्ये फाइल शेअरिंग, मल्टीटास्किंगसाठी स्मार्ट सॉफ्टवेअर आहे. OnePlus ने OnePlus पॅडवरील ऑडिओ सिस्टमसाठी डॉल्बीसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये तुम्हाला उत्तम आवाज असलेले चार स्पीकर मिळतात.


OnePlus Pad Launch : oneplus पॅड किंमत आणि रंग


वनप्लस पॅड सिंगल हॅलो ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. OnePlus ने पॅडची किंमत जाहीर केली नाही, परंतु इंटरनेटवर समोर आलेल्या माहितीनुसार, हा पॅड  24,999 रुपयांना उपलब्ध होऊ शकतो. अचूक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.


Oneplus ने 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही केला लॉन्च 


OnePlus ने OnePlus 65 इंच Q2 Pro TV (OnePlus Q2 Pro 65 इंच स्मार्ट QLED TV) लॉन्च केला आहे. OnePlus ने 2019 मध्ये OnePlus Q1 Pro लॉन्च केला होता, जो 55 इंच होता. तर आज कंपनीने OnePlus 65 इंच Q2 Pro स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. Q2 Pro मध्ये तुम्हाला तळाशी एक साउंड बार दिसेल. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला डायनॉडिओ ट्यून केलेले स्पीकर मिळतील. हा 65-इंचाचा डिस्प्ले टीव्ही 4K रिझोल्यूशनला सपोर्ट करेल आणि 120hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, तुम्हाला या स्मार्ट टीव्हीमध्ये 4 HDMI पोर्ट, 3 USB पोर्ट, 1 हेडफोन पोर्ट इत्यादी मिळतील. हा स्मार्ट टीव्ही आज 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे.


Lenovo Tab P11 5G लॉन्च 


Lenovo ने भारतात आपला 5G टॅबलेट Lenovo Tab 11 लॉन्च केला आहे. कंपनीने याला दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर केले आहे. पहिल्या 128GB ची किंमत 29,999 रुपये आहे आणि दुसऱ्या 256GB ची किंमत 34,999 रुपये आहे. तुम्ही Lenovo Tab P11 5G ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Lenovo च्या अधिकृत स्टोअरवरून खरेदी करू शकता.