मुंबई : अलिकडे वनप्लस (OnePlus) स्मार्टफोनकडे युजर्सचा कल वाढताना दिसत आहे. वनप्लस आयफोनला टक्कर देत आहे. त्यामुळे अनेक जण आयफोनकडे आकर्षित होताना दिसत आहेत. पण, अशातही काही लोक असे आहेत, ज्यांना वनप्लस फोन घेण्याची इच्छा आहे पण, त्याच्या किंमतीमुळे ते शक्य नाही. अशा लोकांसाठी वनप्लसने आता स्वस्तातला फोन आणला आहे. वनप्लस कंपनीने नवीन वनप्लस नॉर्ड सीई 4 लाइट 5 जी (OnePlus Nord CE4 Lite 5G) स्मार्टफोन लाँच केला आहे. सर्व अपेक्षांच्या पलीकडे जाऊन वनप्लसने हा खिशाला परवडणारा फोन लाँच केला आहे.
स्वस्तात मस्त वनप्लसचा फोन!
वनप्लस कंपनीने बुधवारी Oneplus Nord CE4 Lite 5G फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन स्वस्त दरात लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे खिशाला परवणाऱ्या बजेटमध्ये तुम्ही आता वनप्लस फोनचा आनंद घेऊ शकता. यामध्ये अनेक दमदार फिचर्सही आहे. या फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.
8GB LPDDR4X रॅम, 50MP कॅमेरा
वनप्लसने भारतात नवीन वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी लाँच केला आहे. वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी मध्ये 5500 एमएएच उच्च क्षमतेची बॅटरी, 80 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग, 120 हर्ट्झ सुपर-ब्राइट 2100 निट्स एमोलेड डिस्प्ले, ॲक्वा टच आणि iOS सह सोनी लिटिया 600 कॅमेरा असून या सीरिजच्या टॉप व्हेरियंट स्मार्टफोनला टक्कर देणारे फिचर्स आहेत.
26 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध
वनप्लसचे अध्यक्ष आणि सीओओ किंडर लियू यांनी यावेळी सांगितलं की, "नवीन वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी लाँच करताना आम्ही खूपच खूश आहोत कारण हा एक बजेटमधील फोन असून त्यामध्ये वनप्लसचे प्रमुख फिचर्स आणि तंत्रज्ञान यांचा समावेश करण्यात आला आहे. वनप्लसने युजर्सला सहन कराव्या लागणाऱ्या कटकटीशी संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या फोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाईफ, फास्ट चार्जिंग, आकर्षक डिस्प्ले आणि उल्लेखनीय फोटोग्राफी क्षमता असलेला वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी वापरकर्त्यांना एका उत्कृष्ट किंमतीत वनप्लसच्या उत्तम स्मार्टफोनच अनुभव देईल."
OnePlus Nord CE4 Lite 5G चे भन्नाट फिचर्स
- या फोनची बॅटरी उत्तम असून रात्रंदिवस चालण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5G उच्च-क्षमतेच्या बॅटरीसह या किंमतीच्या श्रेणीतील सर्वोत्तम फोनपैकी एक आहे. वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी मध्ये 5500 एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी असल्यामुळे त्यात 20.1 तासांपर्यंत यूट्यूब व्हिडीओ प्लेबॅक करता येतात, 47.62 तास व्हिडीओ कॉल्स करता येतात किंवा पूर्णपणे चार्ज असल्यावर हा फोन दोन दिवस नियमित वापरता येतो. यामुळे युजर्सना बॅटरी लाईफबद्दल कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
- वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा 120 हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्लेमध्ये 2,100 निट्सचा पीक ब्राइटनेस असून वनप्लस 11 मध्ये देण्यात आलेल्या त्याच प्रकाश सामग्रीचा वापर यात करण्यात आलेला आहे. 6.67 इंचाचा 120 हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले मागील जनरेशनच्या एलसीडी तंत्रज्ञानाच्या तुलनेत प्रकाश, रंग एकरूपता, व्ह्यूइंग अँगल सुधारणा मिळेल. यामध्ये 8जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256 जीबी यूएफएस2.2 स्टोरेज आहे.
- गेम खेळताना, व्हिडीओ पाहताना किंवा गाणी ऐकताना अधिक तल्लीन करणारा ऑडिओ अनुभव प्रदान करण्यासाठी, वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी मध्ये परिणामकारक ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत. फक्त व्हॉल्यूम की दाबल्यास व्हॉल्यूम 300 टक्क्यांपर्यंत वाढवता येतो. 3.5 मिमी हेडफोन जॅकचा वापर करून, वापरकर्त्यांना चांगल्या प्रतीचा वायर असलेला हेडफोन वापरून उच्च-दर्जाच्या ऑडिओचा आनंद घेता येईल.
- ओआयएस सह 50एमपी लिटिया 600 मेन कॅमेरा सेन्सर, तसेच 2एमपी डेप्थ-असिस्ट कॅमेरा आणि 16 एमपी फ्रंट कॅमेरा यांच्यासह, वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी फोटोग्राफी करण्यास उत्साही लोकांना पूर्णपणे अद्ययावत फोटोग्राफी अनुभव प्रदान करतो जेणेकरून त्यांना आयुष्यातील सर्वोत्तम क्षण टिपता येतील.
- हा फोन 50 एमपी लिट-600 मेन कॅमेरा सेन्सर क्रॉप करून 2 एक्स इन-सेन्सर झूमला सपोर्ट करतो, ज्यामुळे वाढीव स्पष्टता आणि अचूकता यांच्यासह नैसर्गिक दृश्यातील लँडस्केप मोडमध्ये बारकावे टिपता येतात. 2 एमपी डेप्थ-असिस्ट कॅमेरा, लिट-600 चे 2 एक्स इन-सेन्सर झूम आणि अधिक बुद्धिमान एज डिटेक्शन यांच्या मदतीने, खरे बोकेह इफेक्ट्स आणि तीक्ष्ण विषय विलगीकरण यांच्यासह पोर्ट्रेट-स्टाईल फोटो काढणे आता अधिक सोपे झालं आहे, जे खात्रीशीरपणे प्रतिमांना वेगळं बनवितात.
सोपे, टिकाऊ डिझाइन
Oneplus Nord CE4 Lite 5G फोन सुपर सिल्व्हर, मेगा ब्लू आणि अल्ट्रा ऑरेंज अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. सुपर सिल्व्हरच्या कडेच्या बाजूला आरशासारखे मेटल ग्रेडिएंट ट्रांझिशन देण्यात आलेले आहे. मेगा ब्लू व्हेरियंटच्या फोनमध्ये निळ्या रंगाची सर्वात उठावदार शेड आहे. अल्ट्रा ऑरेंज हा एक ज्वलंत बर्न्ट ऑरेंज रंग आहे, जो शरद ऋतूतील सूर्यास्ताचा अनुभव देतो.
किंमत आणि उपलब्धता
भारतात गुरुवार 27 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी विक्रीसाठी उपलब्ध होईल. वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी रु. 19,999 मध्ये 8जीबी + 128जीबी आणि रु. 22,999 मध्ये 8जीबी + 256जीबी या दोन व्हेरिएंट्स मध्ये oneplus.in, वनप्लस स्टोअर ॲप, वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, Amazon.in, रिलायन्स डिजिटल, क्रोमा आणि इतर ऑफलाइन पार्टनर स्टोअर्सवर उपलब्ध असेल. 27 जूनला दुपारी 12 वाजल्यापासून सुपर सिल्व्हर आणि मेगा ब्लू व्हेरिएंट्स ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. अल्ट्रा ऑरेंज त्यानंतर उपलब्ध केला जाणार आहे. अधिक अपडेट्ससाठी सोबत रहा.
ग्राहकांना आय.सी.आय.सी.आय बँक आणि वनकार्ड क्रेडिट कार्ड आणि निवडक बँक कार्डवर EMI सह आणि तीन महिन्यांचा नो कॉस्ट EMI सह 1000 रुपयांची सूट मिळवण्याचा लाभ उचलता येईल. oneplus.in आणि वनप्लस स्टोअर ॲपवरून खरेदी केल्यास विद्यार्थ्यांना 250 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. सर्व नवीन जिओ पोस्टपेड ग्राहकांना वनप्लस नॉर्ड सीई4 लाइट 5जी खरेदीवर 2250 रुपयांपर्यंतचा लाभ उचलता येतील. ग्राहकांना बजाज फिनसर्व्ह, आय.सी.आय.सी.आय बँक कन्झ्युमर फायनान्स आणि एच.डी.बी.एफ.एस कन्झ्युमर लोन्स यांच्याकडून 6 महिन्यांच्या नो कॉस्ट EMI चा लाभ घेता येईल.