Oneplus Ace 2V: चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने (Oneplus) नवीन स्मार्टफोन वनप्लस ऐस 2 व्ही लॉन्च केला आहे. कंपनीने 3 स्टोरेज पर्यायांमध्ये हा मोबाईल फोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 27,000 रुपयांनी सुरू होते. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जो ग्लोबल स्तरावर देखील लवकरच सादर केला जाईल. हा फोन वनप्लस नॉर्ड 3 या नावाने ग्लोबल मार्केटमध्ये येईल. भारतातही लोक उत्सुकतेने वनप्लस नॉर्ड 3 ची प्रतीक्षा करीत आहेत. कारण हा बजेट सेगमेंट स्मार्टफोन असेल.


Oneplus Ace 2V: किंमत 


वनप्लस एसीई 2 व्ही चीनमधील कंपनीने 3 स्टोरेज पर्याय 12/256,16/256 आणि 16/512 जीबीमध्ये लॉन्च केला आहे. मोबाईल फोनच्या 12 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 27,147 रुपये आहे तर 16/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 29,486 रुपये आहे आणि 16/512 जीबी व्हेरिएंटची किंमत 33,024 रुपये आहे.


Oneplus Ace 2V: स्पेसिफिकेशन 


वनप्लस एसीई 2 व्ही स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एफएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120 हर्ट्जच्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोबाईल फोनच्या मागील बाजूस 64 -मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 -मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 -मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर समोरचा 16 -मेगापिक्सल कॅमेरा कंपनीने दिला आहे. हा मोबाईल फोन 5000 एमएएच बॅटरीसह येतो, जो 80 वॅट्सच्या वेगवान चार्जिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 9000 चिपसेटला सपोर्ट करतो. ट्विटरद्वारे अभिषेक यादव याने एसपीएसीचे  स्पेसिफिकेशन  शेअर केले आहेत.






पोकोच्या नवीन फोनवर मिळत आहे चांगली सूट


पोकोने गेल्या महिन्यात पोको एक्स 5 प्रो 5 जी स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनीच्या 6/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. जर तुम्ही आयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डसह पैसे देऊन स्मार्टफोन खरेदी केला, तर तुम्हाला त्वरित 1000 रुपयांची सूट मिळेल. या व्यतिरिक्त मोबाईल फोनवर 20,000 रुपयांची एक्सचेंज सवलत दिली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 5000 एमएएच बॅटरी मिळेल. 


इतर बातमी: 


Womens day Vandana Khemse : दुबईतील बॉडीगार्डची नोकरी सोडली अन् मुलींच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला भारतात परतल्या; तळेगावच्या वंदना केमसेंची धाडसी कहाणी